देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7633 रुग्ण आढळले आहेत. तर, 1 11 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 61,233 झाली आहे.
[read_also content=”धक्कादायक! अमेरिकेत 6 शिक्षिका करत होत्या अल्पवयीन मुलांच लैंगिक शोषण,अखेर बिंग फुटलं, सगळ्या जणींना अटक https://www.navarashtra.com/crime/us-female-teacher-arrested-for-molesting-student-in-school-nrps-386659.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळए देशात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा 5 लाख 31 हजार 152 वर पोहोचला आहे. दिल्लीत सर्वाधिक चार मृत्यू झाले. हरियाणा, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, केरळमधील चार मृतकांचाही यात समावेळ आहे. आत्तापर्यंत देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,४८,३४,८५९ झाली आहे.
[read_also content=”पत्ता चुकल्याने गेला भलत्याचं घरी, Doorbell वाजवल्याने मिळाली एवढी भीषण शिक्षा, आता देतोय जीवन-मरणाशी झुंज https://www.navarashtra.com/world/a-man-shot-a-child-in-america-as-was-ringing-his-doorbell-nrps-386668.html”]
सध्या देशात दैनंदिन संसर्गाचे प्रमाण ०.१४ टक्के नोंदवले गेले आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.68 टक्के आहे. आतापर्यंत 4,42,42,474 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर मृत्यूदर 1.18 टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.