पणजी : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच गोव्यात देखील कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. गोव्यात आज मंगळवार तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूची संख्या २६ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात एक लाखाहून जास्त व्यक्तींच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. परंतु या चाचण्यांमध्ये सुमारे ४००० व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहेत. तसेच काही रूग्ण मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेत आहेत. गोव्यात कोरोनामुळे आतापर्यंत माजी आरोग्य मंत्री आणि एक नगरसेवकांचा बळी गेला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी गोव्याचे माजी मंत्री जुडो फिलिप डिसोझा आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, गोव्यात जवळपास दरदिवशी १५० इतके नवे कोरोनाग्रस्त आढळत असल्याचं सांगितलं जात आहे. तर दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यात ७०० कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.