Vivo X300 Pro Price Dropped: तुम्ही विवो एक्स 300 प्रो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 10 हजार रुपयांची सूट देत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा प्रिमियम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर Vivo X300 Pro च्या खरेदीवर 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. खरं तर हा स्मार्टफोन 1,19,999 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता डिव्हाईस केवळ 1,09,998 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही ऑफर स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे.

Vivo X300 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येते आणि याचे रेजोलूशन 1260 × 2800 पिक्सेल आहे.

विवोच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 प्रोसेसर आहे आणि डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड ऑरिजिन ओएस 6 वर आधारित आहे.

Vivo X300 Pro कंपनीने 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे.

Vivo X300 Pro मध्ये ट्रिपल बॅक कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 200MP कॅमेरा, 50MP कॅमेरा आणि 50MP कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.






