
फोटो सौजन्य सोशल मिडिया
पंचगंगा नदी पुलाजवळ मधमाशांचे पोळे असल्याचे सांगितले जात असून, फटाक्यांचा आवाज आणि धुरामुळे मधमाशा उठल्याने भाविकांची पळापळ झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या लाडक्याबाप्पाला निरोप देत असताना इचलकरंजी येथे नदीवर अनेक भक्त गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते, या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिषबाजी करण्यात आली असताना अचानक आग्या माशांचे पोळे उठल्याने मोठी खळबळ उडाली.माशांच्या हल्यामुळे घाटावर उपस्थितांची पळापळ झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पुलावर गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेची मुख्य कारणे काय ?
घटना आणि कारण – पंचगंगा नदीच्या पुलाजवळ आणि घाटावर अनेक गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जमले होते. यावेळी काही गणेश मंडळांनी आणि भाविकांनी पुलावर, नदीच्या घाटावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. या फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे पुलाजवळ असलेल्या झाडावरील किंवा संरचनेवरील आग्या माशांचे पोळे उठले, आणि फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे आणि धुरामुळे मधमाशांचा पोळाभडकल्या आणि त्यांनी मिरवणुकीतील भाविकांवर हल्ला केला. या मुळे पंचगंगा नदीच्या पुलाजवळ पळापळ आणि गोंधळ झाला. मधमाशांनी अचानक विसर्जन मिरवणुकीत उपस्थित असलेल्या गणेशभक्तांवर आणि नागरिकांवर हल्ला केला. यामुळे घाटावर आणि पुलावर एकच खळबळ उडाली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भाविकांची प्रचंड पळापळ झाली.
सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.अशा सार्वजनिक आणि नदीकाठच्या ठिकाणी विसर्जन करताना प्रशासनाने फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आणि मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. फटाक्यांचा मोठा आवाज, तीव्र प्रकाश आणि धूर यांमुळे मधमाशा चवताळतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी समोर येणाऱ्यांवर हल्ला करतात. पंचगंगा नदी पुलासारख्या सार्वजनिक ठिकाणी असणारी मधमाशांची पोळी अशा प्रसंगी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा