फोटो सौजन्य सोशल मिडिया
हे नवे निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांना मुलांच्या शाळा प्रवेशाचे नियोजन करताना वयाची निश्चित मर्यादा लक्षात घ्यावी लागणार आहे. मात्र, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांत नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नव्या निकषांतून वगळण्यात आले आहे..
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबर रोजी यासंदभांत शासन निर्णय जारी केला आहे.
कांचा मोफत व सकीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ हसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2 + 2pi मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार कयाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात विविध शिक्षण मंडलांच्या शाळांमध्ये प्रवेगास्माती चवाची चगवेगळी गणना होत असल्याने एकसमान निकष लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात होती.
केंद्र सरकारने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देताना सहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असण्याचावत कळविले आहे. त्यानुसार पूर्णराथमिक वर्गाचे वय निश्चित करून ह्या चाचण्या टप्याटप्याने लागू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या नियोजनामुळे नर्सरीपासून पहिलीपर्यंतच्या चगामाती याची सुसंगत रखना तयार होणार आहे.
नव्या वयोमर्यादनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून आवश्यक सूचना व मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांनी प्रवेशाचे वर्ष, मुलाचे ३० जून रोजीचे वय आणि संबंधित वर्गाचे निकष लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. नव्या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाचे निकष अधिक सुसंगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.






