साहित्य:
कृती:
सर्व प्रथम साखर मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. त्यानंतर काजू देखील मिक्सर मधून बारीक करावे. काजू बारीक करत असताना मधे मधे थांबून काजू नीट बारीक होत आहेत ना हे तपासून पहावे. त्यानंतर काजूची पावडर, बारीक केलेली साखर, दुध आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकञ करून घ्यावे. नंतर त्यात आंब्याचा गर किंवा इसेन्स टाकावा आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात गुठळ्या राहु देऊ नये.
एका जाड बुडाचया कढईत हे मिश्रण टाकून ते चांगले उकळून घ्यावे. ते चांगले घट्ट होईपर्यंत हलवत राहावे. चांगले घट्ट झाले कि त्याला एका ताटात किंवा पोळपाटाला तूप लावून हे मिश्रण त्यावर पसरून घ्यावे. वरून चांदीचा वर्ख लावून त्याच्या काजू कतलीच्या आकाराच्या वड्या कापून घ्याव्यात. अशा पद्धतीने स्वादिष्ट काजू कतली तयार.