श्रावण महिना (Shravan Month) हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे. श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहेत. या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. श्रावण महिना (Women) नवविवाहीतांसाठी (Newly Married) खास असतो. तसं वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलीचं कौतुक केलं जातं. पण, श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात.
श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली आहे. अस म्हणतात की,पतीपत्नीमधील प्रेम(love) आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचं पूजन केलं जातं.महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग ५ वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवाहितेचं गोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो.
मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावं. त्यांना भोजन, हळदी-कुंकू द्यावं. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत,गाणी (Balloons, Zimma, playing, songs)गात मंगळागौर जागवतात.
साधी फुगडी, एका हाताची फुगडी, गुडघ्याची फुगडी, बस फुगडीअसं फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात. झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, दोडका कीस तीन-चार प्रकार,अशा प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा होतो. लग्नानंतर सलग ५ वर्षे हे व्रत करावं.
सकाळी स्नान केल्यानंतर सोवळं नेसून, ही पूजा केली जाते. सर्वातआधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते. लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. शेजारी शिवपिंड, समोर कणकेचे दिवे अशी आरास सजवण्यात येते. नंतर मग मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचं आवाहन करावं.देवीला विविध फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचावी. कहाणी वाचून झाली की महानैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पन करतांना १६ दिव्यां त्या नैवद्यासमोर लावावेत. यानंतर मनोभावे पूजा करुन अखंड सौभाग्य प्राप्तीचा वसा मागावा.