Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षण : नारायण राणेंनी राज ठाकरेंसह संभाजी राजेंवरही साधला निशाणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी राज्य सरकारचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही प्रहार केला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 28, 2021 | 03:32 PM
मराठा आरक्षण : नारायण राणेंनी राज ठाकरेंसह संभाजी राजेंवरही साधला निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भाजपचे नेते राज्याचे दौरे करत आहेत. सरकारने आता जो प्रस्ताव पाठवयाचा आहे तो अभ्यासपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी चांगले वकील आणि सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले मुद्दे आहेत, त्याला धरुन योग्य प्रस्ताव गेला पाहिजे. तसा प्रस्ताव भाजप तयार करत आहे आणि त्यासाठी भाजपने काही वकिलांची नेमणूक केली आहे,’ अशी माहिती भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणेंनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी राज्य सरकारचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही प्रहार केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून नारायण राणेंनी राज ठाकरे यांना चिमटे काढले आहेत. ‘म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का?’ असा टोला राणे यांनी राज ठाकरेंना लगावला. ‘मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत,’ असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंनाही कोपरखळी दिली आहे.

[read_also content=”भाजलेले चणे खाल्याने बुद्धी होते आणखी तल्लख; जाणून घ्या असेही आहेत फायदे https://www.navarashtra.com/latest-news/eating-roasted-grams-makes-the-intellect-even-more-brilliant-nrvb-134815.html”]

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही, असं विधान काही दिवसांपूर्वी संभाजी राजे यांनी केलं होतं. यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं बोलणं चुकीचं आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजप सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरत आहेत त्यांनी काय केलं? शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केलं? मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकार किती गंभीर आहे? स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

[read_also content=”लोक पॉर्न का पाहतात ? त्याची कारणं काय ? नव्या अभ्यासातून समोर आले ‘हे’ खुलासे https://www.navarashtra.com/latest-news/why-do-people-watch-porn-what-is-the-reason-big-revelations-proportion-from-a-new-study-of-porn-viewing-nrvb-134784.html”]

भ्रष्टाचाराचाही गंभीर आरोप

राज्य सरकारच्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरून खासदार नारायण राणेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे. या टेंडरमध्ये १२ टक्के पैसे ठेकेदाराकडे मागितल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा या ठेकेदाराकडे पैशाची मागणी झाली आणि त्यानंतर हे टेंडर नको म्हणून सागंण्यात आलं. यांना लसी खरेदी करून रुग्णांना बरे करायचे नाही, तर हे पैसे कमवायला बसल्याचा घणाघाती आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

Web Title: Maratha reservation bjp rajyasabha mp narayan rane criticizes sambhaji raje chhatrapati and mns raj thackeray nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2021 | 03:32 PM

Topics:  

  • BJP
  • Maratha Reservation
  • Narayan Rane
  • raj thackeray
  • Sambhaji Raje Chhatrapati

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
2

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी
4

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.