Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारकऱ्यांच्या सेवेत फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी दृढ

पंढरपूर वारीनिमित्त फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे लाखो वारकऱ्यांसाठी पाच लाख जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय शिबिरे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 06, 2026 | 10:29 PM
वारकऱ्यांच्या सेवेत फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी दृढ
Follow Us
Follow Us:

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना होत असताना राज्यभरातून लाखो वारकरी आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पंढरपूर वारीशी फिनोलेक्स पाईप्सने गेली तीन दशके जपलेले सामाजिक बांधिलकीचे नाते यंदा अधिक दृढ केले आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिनोलेक्स पाईप्सतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू पी. छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.

आठशे वर्षांहून अधिक काळापासून पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदा फिनोलेक्स पाईप्सक आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सुमारे पाच लाख जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये तीन लाखांहून अधिक युटिलिटी बॅग, ५० हजार पावसाळी कुंचे (घोंगते), ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आधाराच्या काठ्या तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. वारी मार्गावर विविध ठिकाणी आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरांतून आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला, औषधे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविली जात आहे.

विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

वारीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेल्या पोलिस प्रशासनालाही फिनोलेक्सने मदतीचा हात दिला आहे. हजारो पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि पंढरपूर पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’साठी विशेष जॅकेट्स देण्यात आले आहेत. तसेच पंढरपूर पोलिस विभाग आणि मंदिर समितीच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या सोयीसाठी माहिती व सतर्कता फलक उभारण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमांत स्वयंसेवकांना १० हजार टी-शर्ट्स व टोप्यांचे वाटप करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत पंढरपूरमध्ये वृक्षारोपण मोहीम आणि महत्त्वाच्या ठिकाणी कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात येत आहे

चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भारतात ‘पाईप’ म्हटले की सर्वप्रथम फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जचे नाव समोर येते. फिनोलेक्सने गेल्या ४५ वर्षांत महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही तितक्याच प्रभावीपणे जपणाऱ्या फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने गेली तीन दशके पंढरपूर वारीत वारकऱ्यांची सेवा करून समाजाप्रतीची बांधिलकी सिद्ध केली आहे. वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी आनंदाची बाब असून, फिनोलेक्ससारखी समाजहिताची परंपरा जपणारी कंपनी महाराष्ट्रात असल्याचा अभिमान वाटतो.”

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया म्हणाले, “पंढरपूर वारी ही श्रद्धा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेने, शेतकऱ्यांनी गेल्या ४५ वर्षांत फिनोलेक्सवर दाखविलेल्या विश्वासामुळेच आमचा प्रवास अधिक समृद्ध झाला आहे. वारकऱ्यांची सेवा करून त्या विश्वासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. फिनोलेक्सने ४५ वर्षांच्या वाटचालीत समाजसेवा आणि समुदाय विकासाला केंद्रस्थानी ठेवत पंढरपूर वारीशी असलेले नाते अधिक मजबूत केले असून, परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. समाजाशी आणि परंपरेशी असलेली आमची बांधिलकी यापुढेही कायम राहील.”

देहूनगर पंचायत पालखी सोहळ्यासाठी सज्ज; चाळीस कॅमेऱ्यांची नजर

फिनोलेक्स पाईप्सविषयी

गेल्या ४५ वर्षांपासून फिनोलेक्स पाईप्स भारताच्या जलसुविधा उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेती, प्लंबिंग, स्वच्छता आणि औद्योगिक क्षेत्रासाठी उच्च दर्जाच्या पीव्हीसी पाइप्स व फिटिंग्जची निर्मिती करणारी ही कंपनी देशातील पहिली आणि एकमेव बॅकवर्ड-इंटिग्रेटेड पीव्हीसी पाईप्स उत्पादक आहे. अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, देशव्यापी वितरण व्यवस्था आणि गुणवत्तेप्रती असलेली कटिबद्धता यामुळे फिनोलेक्सने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. उत्पादनापुरते मर्यादित न राहता नावीन्य, शाश्वत विकास, लोकाभिमुख उद्योग आणि ग्राहककेंद्रित सेवा या मूल्यांवर कंपनीचा भर आहे. शेतकरी, प्लंबर, वितरक आणि विविध संस्थांशी दीर्घकालीन विश्वासाचे नाते निर्माण करत फिनोलेक्सने उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९८१ पासून गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या मूल्यांवर उभ्या असलेल्या कंपनीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समुदाय सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प कायम ठेवला आहे.

मुकुल माधव फाउंडेशनविषयी

फिनोलेक्स पाईप्सचे सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनची स्थापना १९९९ मध्ये झाली. देशातील २४ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेले हे फाउंडेशन गेल्या २५ वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता, दिव्यांग कल्याण, आपत्ती निवारण, क्रीडा आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. तळागाळातील वंचित घटकांना सक्षम बनविणे, समाजात समान संधी उपलब्ध करून देणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विविध सामाजिक संस्था, उद्योगसमूह आणि स्थानिक भागीदारांच्या सहकार्याने फाउंडेशन सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने योगदान देत असून, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या १७ उद्दिष्टांना आणि भारत सरकारच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या १६ मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करत आहे.

Web Title: Mukul madhav foundation social work for warkaris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:29 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

₹ २२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पाचा भोंगळ कारभार उघड! नदीत गाडलेल्या पाइप वाहून गेल्या, ६५% कामानंतरही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
1

₹ २२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पाचा भोंगळ कारभार उघड! नदीत गाडलेल्या पाइप वाहून गेल्या, ६५% कामानंतरही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त
2

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Rain : चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
3

Maharashtra Rain : चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी
4

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.