Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain : चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा निचरा, नाले साफसफाई आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 05:30 PM
चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची धाव
  • प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी
  • अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
चिपळूण : चिपळूण शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. नगराध्यक्षांनी पेठमाप आणि शंकरवाडी परिसराला भेट देऊन पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. यावेळी शिक्षण सभापती तथा नगरसेविका हर्षाली पवार, नगरसेवक प्रमोद बुरटे, संदीप भिसे, संजय गोताड तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्यक्ष पाण्यात उतरून घेतला आढावा

पाहणीदरम्यान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नाले आणि गटारांमध्ये अडथळे असल्यास ते तात्काळ हटवावेत, पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर युद्धपातळीवर काम करावे, असे आदेश त्यांनी दिले.

पुरंदरला दमदार पावसाने बळीराजा सुखावला; माऊलींच्या आगमनापूर्वीच पाण्याचा प्रश्न मिटणार

संवेदनशील भागांवर विशेष लक्ष

शहरातील संवेदनशील भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी संबंधित विभागांना दिल्या. पावसाचा जोर कायम असतानाही विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत

चिपळूण नगर परिषदेकडून शहरातील संवेदनशील भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाणी साचू नये यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केल्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, संकटाच्या काळात प्रशासन तत्परतेने काम करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?

Web Title: Chiplun municipal president umesh sakpal inspects waterlogging heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Chiplun
  • maharashtra
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
1

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
2

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
3

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
4

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.