Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 06, 2026 | 05:08 PM
सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात 'आणीबाणी' जाहीर करण्याची मागणी (Photo Credit- X)

सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात 'आणीबाणी' जाहीर करण्याची मागणी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’,
  • सुप्रिया सुळेंचा संताप
  • राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनच्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुंबई-पुणे दळणवळण ठप्प झाले आहे. याच गंभीर परिस्थितीचा दाखला देत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. पावसामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि मोठे नुकसान पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तातडीने ‘आणीबाणी’ जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

असं चित्र महाराष्ट्रात कधीच नव्हतं – सुप्रिया सुळे

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात यापूर्वीही पाऊस झाला आहे आणि मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं भयानक चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून अतिशय चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय आहे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भाष्य करणे आवश्यक आहे.

मुंबई-पुण्यासह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूकीची कोंडी होत असून यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माझी शासनाला विनंती आहे की, पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह पावसाचा तडाखा बसलेल्या… — Supriya Sule (@supriya_sule) July 6, 2026

मुंबई-पुणे संपर्क पूर्णपणे तुटला; एक्स्प्रेसवे आणि ताम्हिणी घाट बंद

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’सह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. ताम्हिणी घाटातही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “आळंदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळत (Landslides) आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांतील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी किंवा अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे काय? सरकारने यावर वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे.”

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

थाटामाटात उद्घाटन झालेल्या ‘मिसिंग लिंक’च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

नुकत्याच सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरले. या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते आणि सर्वांनी त्याचे स्वागत केले होते. मात्र, आता पावसाळ्यात या प्रकल्पाशी संबंधित समोर येणारे व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक आहेत. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, मग नियोजन का चुकले? या प्रकल्पाचे ‘सेफ्टी ऑडिट’ झाले होते का? नैसर्गिक आपत्तीचा विचार करून डिझाईन केले होते का? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच वसई-विरार, भांडूप आणि मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये सुरक्षितता आणि पर्यावरणाचा पुरेसा विचार झालेला नसल्याचा आरोप करत त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली.

सत्ताधारी विरोधकांवर कारवाई करण्यात व्यस्त

सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधारी नेते सतत केवळ विरोधकांवर कारवाया करण्यात आणि राजकारणात व्यस्त आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर चंदा चोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात ‘इंडिया’ (INDIA) आघाडी ताकदीने मांडेल, तसेच या विषयावर आघाडीच्या आगामी बैठकीतही सविस्तर चर्चा केली जाईल.

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Web Title: Supriya sule outraged demands declaration of emergency in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Heavy Rain
  • maharashtra
  • mansoon
  • Missing Link Project
  • supriya sule

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
1

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
3

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
4

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.