Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suraj Chavan Resigned : अजित पवारांचा दणका! सूरज चव्हाण यांचा थेट घेतला राजीनामा, मारहाण करणं भोवलं

Suraj Chavan Resigned : छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 21, 2025 | 02:28 PM
NCP Suraj Chavan resigns over assault on Chhawa organization officials decision by Ajit Pawar

NCP Suraj Chavan resigns over assault on Chhawa organization officials decision by Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:

Suraj Chavan Resigned : लातूर : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चर्चेमध्ये आले आहेत. राज्याचे कृषीमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांचा जंगली रम्मी खेळातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. विधीमंडळामध्ये कृषीमंत्री हे गेम खेळत असल्याच्या कारणावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे या संदर्भात छावा संघटनेने निवेदन दिले. मात्र हे निवेदन देताना त्यांनी पत्ते फेकले. यामुळे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. यामुळे सूरज चव्हाण यांचा थेट राजीनामा घेण्यात आला आहे.

सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना जोरदार मारहाण केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील जबर मारहाण केल्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दणका दिला आहे. अजित पवार यांनी मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट करुन माहिती दिली आहे. अजित पवार यांनी लिहिले आहे की, “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे,” असा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत… — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 21, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

माणिकराव कोकाटेंबाबत अजित पवार निर्णय घेतील

सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी तटकरे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी लोकांचे प्रश्न आणि संतप्त भावना हे संयमीपणाने समजून घेतले पाहिजे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानंतर सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार हेच निर्णय घेतील. झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आज देखील मी चर्चा केली आहे. त्यांची मागणी आणि निवेदन आज देखील शांतपणाने ऐकले आहे. त्यामुळे या संदर्भात देखील पक्ष निर्णय घेईल,” असे सूचक वक्तव्य अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.

Web Title: Ncp suraj chavan resigns over assault on chhawa organization officials decision by ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Manikrao Kokate
  • sunil tatkare
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
1

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
2

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे
3

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.