मुंबई: बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर लवकरच कलर्स टीव्हीच्या आगामी ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या शोमधून स्मॉल स्क्रीनवर एन्ट्री करत आहेत. या शोमध्ये नीतू कपूर जज म्हणून दिसणार आहेत. तसंच खास बात म्हणजे अभिनेत्री नोरा फतेही आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर मार्झी पेस्टोनजी देखील या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अनेक बच्चेकंपनी या शोमध्ये सहभागी होऊन आपल्या टॅलेंटचा जलवा यात दाखवणार आहेत. खरंतर अभिनेत्री नीतू कपूर यांनीदेखील बालवयातच आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यामुळे हा डान्स शो त्या खूपच एन्जॉय करणार आहेत. तसंच ते या मुलांना डान्सचे काही टिप्सदेखील देणार आहेत. 80 च्या दशकात डान्स फॉर्म वेगळा होता पण आजही बॉलीवूडमध्ये त्या सिनेमांची, त्या डान्सची क्रेझ आहे. त्यामुळे या शोच्या निमित्ताने नितू कपूर नोस्टॅलजिक होणार एवढं मात्र नक्की.