Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

ओडिशाच्या बोलांगीरमध्ये जेवणाच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामागे अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राचा कथित संबंध असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 10:17 AM
ओडिशाच्या बोलांगीरमध्ये जेवणाच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामागे अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राचा कथित संबंध असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ओडिशाच्या बोलांगीरमध्ये जेवणाच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामागे अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राचा कथित संबंध असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
Follow Us:
  • जेवणाच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावलं
  • हत्यानंतर मृतदेह आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी लपवलं
  • अंधश्रद्धेच्या कथित एंगलमुळे पोलिसांचा तपास सुरू
ओडिशाच्या बोलांगीरमधून एक असे धक्कादायक प्रकरण समोर येत आहे ज्याने परिसरात खळबळ उडवली. घटनेची सुरुवात जेवणाच्या निमंत्रणापासून सुरु होते. १८ ऑगस्ट रोजी ४० वर्षीय संतोष खरासेलला शत्रुघ्न साहू नावाच्या मित्राने आपल्या घरी जेवणासाठी बोलावून घेतले. संतोषच्या ध्यानीमनीही नव्हते की हे निमंत्रण जेवणासाठी नाही तर त्याच्या बळीसाठी होते. जेवण खाऊ घातले आणि झोपेतच शत्रुघ्नने संतोषवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने मित्राचा शिरच्छेद करुन त्याची निघृण हत्या केली. मुख्य म्हणजे ही हत्या कोणत्या विवादातून नाही तर धार्मिक विधींसाठी केल्याचे समोर येत आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेहाला गावाबाहेरील एका तलावात फेकले तर कथितपणे डोकं मात्र एका प्रार्थना कक्षात लपवले.

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एका रिपोर्टनुसार, स्थानिकांना तलावात काही संशयित आढळले. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर तलावात शिर नसलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी विशेष पथक दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी आपला तपास सुरु केला असता संतोषला मृत्यूआधी शत्रुघ्नसोबत पाहिल्याचे स्पष्ट झाले. पोलिस जेव्हा आरोपी संतोषच्या घरी गेली तेव्हा कथितरित्या तो ध्यान करण्यात मग्न होता. सुरुवातीला त्याने दारूवरून झालेल्या वादाची कहाणी सांगितली. मात्र, जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे या कथित हत्येशी आणि कापलेल्या डोक्याशी संबंधित आणखी एक रहस्य समोर आले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तपासादरम्यान त्या जागेची माहिती दिली जिथे संतोषचे कापलेले शिर लपवण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी खोदकाम करुन शीर आपल्या ताब्यात घेतले. रक्तात माखलेले धारदार शस्त्रदेखील घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. पोलिसांनी या घटनेत मुख्य आरोपी शत्रुघ्न साहू याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. सध्या आरोपीच्या कुटुंबाची चाैकशी सुरु आहे.

पोलिसांना असा संशय आहे की, हे प्रकरण वैयक्तिक वादाचे प्रकरण नसून तपासात कथितरित्या अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा संबंध असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनुसार, शत्रुघ्नने चाैकशीत दावा केला की, सोडून गेलेल्या बायकोला परत मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. पत्नी १० वर्षांपासून मुलांना घेऊन वेगळी राहत होती. अशात पोलिसांना संशय आहे की, पत्नीने घरी परत येण्यासाठी आरोपीने तंत्रमंत्राचा उपयोग केला आहे. याच प्रयत्नात त्याने कथितरित्या संतोषचा बळी देण्याचा प्लॅन आखल्याचेही सांगण्यात येत आहे. तथापि या दाव्याची पूर्ण पडताळणी अद्याप केली नाही.

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

पाच आरोपींना अटक

पोलिसांनी स्पष्ट केले की, चाैकशीदरम्यान मुख्य आरोपी शत्रुघ्न साहू याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी संतोषच्या शिरासह ज्या धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली ते शस्त्रही आपल्या ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणात बाकी आरोपींची काय भूमिका आहे आणि तंत्रमंत्राचा एंगल किती खरा आहे या सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे.

Web Title: Odisha bolangir crime friend murder human sacrifice black magic wife viral case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Odisha

संबंधित बातम्या

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
1

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
2

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
3

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
4

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.