Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आघाडीत बिघाडी; प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर! उमेदवारांची यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ चा पवित्रा घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2024 | 01:28 PM
आघाडीत बिघाडी; प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर! उमेदवारांची यादी जाहीर
Follow Us
Follow Us:

नागपूर – आगामी लोकसभा निवडणूकीमुळे देशभरातील तसेच राज्यातील राजकीय सूत्रे बदलताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीमध्ये बिनसलेले दिसून येत होते. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ चा पवित्रा घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घेत प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतले आहेत. नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीच्या राज्यसमितीची काल बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणूक लढण्यासंदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत. आमच्याबरोबर जे आघाडी करण्यासाठी इच्छूक होते. त्यांना आम्ही सांगितले की, महाराष्ट्रातील जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्यावा. पण तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही. जरांगे पाटील यांच्यासह काल आमची बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी विचार विनिमय करून अर्ज करण्याचे आमचे ठरले आहे.” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, भाजपाने मुस्लीमांना बाजूला टाकण्याचं राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याचे आम्ही ठरविले. तसेच जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मराठा, मुस्लीम आणि गरीब ओबीसी यांची सांगड घालून आम्ही नवी वाटचाल करत आहोत. राजकारणात हल्ली प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे निवडून गेलेला नेता जनतेशी बांधिलकी न ठेवता त्याला देणगी देणाऱ्यांशी बांधिलकी ठेवतो. त्यामुळे आम्ही सामान्य जनतेला आवाहन करत आहोत की, गावागावातून लोकांनी पुढे येऊन प्रचार करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमधून केले.

 

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीमधून ते बाहेर पडले आहेत का याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देणं टाळलं आहे. आज फक्त उमेदवारांची घोषणा करत आहे. प्रश्नोत्तरांना उद्या उत्तर देईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट

गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मढावी

चंद्रपूर – राजेश बेले

बुलढाणा – वसंत मगर

अकोला – प्रकाश आंबेडकर

अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान

वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे

यवतमाळ-वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार

 

 

 

Web Title: Prakash ambedkar announce first list of candidate for lok sabha election 2024 big set back to mahavikas aghadi nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • political news
  • Prakash Ambedkar
  • VBA Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.