उद्यापासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 लढत सुरू होणार आहे. दोन्ही संघ कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर तीन सामन्यांची T20I मालिका खेळणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील वेग कायम राखत भारतीय संघांची विजयानं सुरुवात करायच्या इच्छा आहे तर वेस्ट इंडिज संघही भारत दौऱ्यातील पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तयारी आणि रणनीती तपासण्याकडे लक्ष देईल. यामुळेच सोमवारी कोलकात्यात भारतीय खेळाडूंनी घाम गाळला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल यांच्यासह सर्व खेळाडू सराव सत्रात दिसत होते. मालिकेपूर्वी खेळाडूंनी परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बीसीसीआयने संध्याकाळी उशिरा या मालिकेसाठी उपकर्णधाराच्या नावाचा खुलासा केला. केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणजेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत ऋषभ पंत आपला कर्णधार रोहित शर्माला रणनीती बनवण्यात साथ देईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. याआधी टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत पाहुण्या संघाचा सफाया केला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज. खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव