
Rahul Gandhi Press Conference, Gyanesh Kumar CEC Dispute
२ निवडणूक आयुक्तांचे १४ आक्षेप डावलल्याचे वृत्त समोर आल्यावर राहुल गांधी आक्रमक
‘सत्ताविरोधी लाट असताना भाजप प्रत्येक निवडणूक कसा जिंकतो?’ – राहुल गांधींचा सवाल
महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप
Rahul Gandhi Attack on Dnyanesh Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन मुख्य आयुक्तांशी झालेले मतभेद चव्हाट्यावर आल्याने संपूर्ण देशातील राजकारण तापले आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, दोन निवडणूक आयुक्त, सुखबीर संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत एसआयआर आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित १४ लेखी आक्षेप दाखल केले आहेत. या आक्षेपांमुळे मतदार यादीत नावे समाविष्ट करणे आणि वगळणे तसेच कार्यपद्धतीतील बदलांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण ज्ञानेश कुमार यांनी इतर दोघांचे आक्षेप डावलून निर्णय घेतले. हा वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
सत्ताविरोधी लाटेचा भाजपवर परिणाम का होत नाही? भाजप प्रत्येक निवडणूक कशी जिंकतो? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. संविधानावर सातत्याने हल्ले होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानात हेराफेरी झाली आहे.असा आरोपही त्यांनी केला.
Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’
मुख्य निवडणूक आयोगाच्या (CEC) वादासंदर्भात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील निवडणुकांवर परिणाम झाला. सत्ताविरोधी लाटेचा भाजपवर परिणाम का होत नाही? भाजप सातत्याने निवडणुका कशा जिंकतो?” असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांची निवड पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. ज्ञानेश कुमार यांनी प्रत्येक निवडणुकीत फेरफार केली आहे. सत्ताविरोधी लाट हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे. मतचोरी हा प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे उल्लंघन आहे.
राहुल गांधी म्हणाले, “भाजपच्या विजयाची पोलखोल झाली आहे. मतचोरीचे पुरावे समोर येत आहेत. दोन निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांची पोलखोल केली आहे. २०२४ मध्येही मतचोरी झाली होती. व्यवस्थेच्या विनाशासाठी ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत.” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ज्ञानेश कुमार हे निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली. हा संविधानावरचा हल्ला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा या षडयंत्राचे मास्टरमाईंट आहेत, यात मला कोणतीही शंका नाही, या कटामागे या पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा हेच आहेत. असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदीं आणि अमित शाहांनी या लोकशाहीवर हल्ला करून ही लोकशाही उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.