अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)काही ना काही कारणावरुन नेहमीच चर्चेत असते. काही दिवसापुर्वी ती पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात दाखल झाली होती. तिने सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगितल्यानंतर फॅन्सनी चिंता व्यक्त केली होती. तर काहींनी तिला नेहमीप्रमाणे काहीतरी ड्रामा करत असल्याचं म्हण्टलं होतं. आता मात्र या प्रकरणी आता अपडेट समोर आली आहे. राखीने काही तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात ट्युमर असल्याचं समोर आलं आहे. आता तिची सर्जरी करण्यात येणार असल्याचं राखीनं सांगितलं आहे. तिचा रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आला असून ती त्यात रडताना दिसत आहे. तिचा व्हिडिओ पाहून आता फॅन्सही तिच्याबद्दल काळजी व्यक्त करताना दिसत आहे.
[read_also content=”ऐश्वर्या रायनंतर कान्समध्ये कियारा अडवाणीची चर्चा, स्टईलिश गाऊनमध्ये केली रेड कार्पेटवर एन्ट्री! https://www.navarashtra.com/movies/kiara-advani-makes-her-cannes-2024-debut-in-a-prabal-gurung-draped-dress-nrps-534619.html”][read_also content=”ऐश्वर्या रायनंतर कान्समध्ये कियारा अडवाणीची चर्चा, स्टईलिश गाऊनमध्ये केली रेड कार्पेटवर एन्ट्री! https://www.navarashtra.com/entertainment/kiara-advani-makes-her-cannes-2024-debut-in-a-prabal-gurung-draped-dress-nrps-534619.html”]
राखी सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे. नुकतेच, तिचे हेल्थ अपडेट देताना राखीने स्वतः खुलासा केला होता की तिच्या पोटात 10 सेमी ट्यूमर आहे, ज्यासाठी शस्त्रक्रिया केली जाईल. अनेक चाचण्या झाल्या आणि अनेक बाकी आहेत. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती वेदना होत असल्याच सांगत आहे आणि रडताना दिसत आहे. तिच्या ट्यूमर आणि शस्त्रक्रियेच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिचा हा व्हिडिओ एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.