(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
देशभरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकजण या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार याचा निषेध करताना दिसत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने एक वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तसेच अभिनेत्रीच्या या विधानामुळे लोक तिला आता देशाबाहेर हाकलण्याची मागणी करत आहे. बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत तिच्या विचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामुळे ती प्रचंड ट्रोल होत असून तिला देशाबाहेर हाकलण्याची मागणी होत आहे.
अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली! ‘Squid Game 3’ बाबत समोर आले महत्वाचे अपडेट
राखीच्या पाकिस्तानी नाऱ्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिनेत्री राखी सावंतच्या या विधानावर विरोध केला आहे. “राखी सावंतने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर स्वत:चं नाव आणि पैसा कमावला आहे. आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करते आहे,” अशी टीका मनसे कार्यकर्ता अनिश खंडागळे यांनी केली. तसेच आता टीका मनसे अभिनेत्रीला देशाबाहेर हाकलून द्या अशी मागणी करत आहेत.
Anti-nationals and traitors like Rakhi Sawant should be immediately expelled from India and sent to Pakistan.
A despicable woman like Rakhi Sawant raises slogans in support of Pakistan while living in India.@SAW_Rakhi1 pic.twitter.com/97BDKWS4pn
— Aditya Kumar Trivedi (@adityasvlogs) May 4, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एबीपीला मुलाखत देताना राखी सावंत म्हणाली की, “मी राखी सावंत आहे, मी खरं बोलेन… पाकिस्तानी लोकांनो, मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान!” अभिनेत्रीच हे वक्तव्य ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. देशात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना, अभिनेत्री राखी सावंतच हे बोलणं लोकांना अजिबात पटलेला नाही आहे. अनेकांनी अभिनेत्रीवर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तिचे भारतातील नागरिकत्व रद्द करावे, अशा मागण्या सोशल मीडियावर केल्या जात आहे. काहींनी तर तिला “दुबईतून भारतात परत येण्यास बंदी घालावी” अशी मागणी केली आहे.
राखी सध्या दुबईमध्ये राहत आहे. याआधीही ती पाकिस्तानच्या समर्थनात बोलली आहे. एकदा तर तिने पाकिस्तानच्या अभिनेत्याशी लग्न करण्याची इच्छा देखील जाहीर केली होती. तेव्हा अभिनेत्री खूप चर्चेत आली आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. परंतु आता अभिनेत्रीचे हे वक्तव्य बऱ्याच लोकांच्या भावना दुखावणारे ठरत आहे. एका बाजूला जवान बलिदान देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राखी सावंतसारख्या लोकांकडून असं वक्तव्य ऐकू येणे याचा अनेक लोकांना राग येत आहे.