(फोटो सौजन्य - x अकाउंट)
पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा आगामी चित्रपट ‘सरदार जी ३’ रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला पाहून लोक संतापले आहेत. भारतात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लोक करत आहेत. दरम्यान, ड्रामा क्वीन राखी सावंतने हानिया आमिरच्या समर्थनार्थ समोर आली आहे. तिने पाकिस्तानी अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्याबद्दल केवळ अभिनंदन केले नाही तर लोकांना सांगितले की सर्वांनी ‘सरदार जी ३’ हा चित्रपट पाहावा.
राखी सावंतने दिला पाठिंबा
राखी सावंतने गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘सरदार जी ३’ चित्रपटातील ‘सोनी लगडी’ हे गाणे शेअर केले, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ आणि हानिया आमिर एकत्र नाचताना दिसत आहेत. ही क्लिप शेअर करताना ड्रामा क्वीनने कॅप्शन दिले, ‘मुबारक हो मेरी जान हानिया आमिर. मी खूप आनंदी आहे. अखेर तुझे बॉलीवूड चित्रपटांमध्ये स्वागत आहे. अभिनंदन ‘सरदार जी, ३’ नक्की पहा.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अखेर ‘Son Of Sardaar 2’ ची निर्मत्यानी केली घोषणा, नेटकऱ्यांनी आधीच म्हटले ब्लॉकबस्टर
चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला
ड्रामा क्वीनने तिच्या इंस्टाग्रामवर ‘सरदारजी ३’ चा आणखी एक व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. या क्लिपमध्ये नीरू बाजवा नाचताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना राखी सावंतने कॅप्शन दिले आहे की, ‘प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा. हानिया आमिर सरदार ३ मधून पदार्पण करत आहे. सर्वांनी तिचे कौतुक करावे. हानिया माझी आवडती आहे. अभिनंदन हानिया, अल्लाह तुला आशीर्वाद देवो.’ असे लिहून अभिनेत्रीने हानियाचे कौतुक केले आहे.
राखीच्या पाठींब्यावर संतापले चाहते
राखीच्या पाठींब्यावर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिकिया दिल्या आहेत. अभिनेत्रीचा हानियाला दिलेला पाठींबा पाहून अनेक नेटकरी राखीचे कौतुक करत आहेत. तर काही राखीवर संतापले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘खूप छान आनंद झाला पाठिंबा पाहून’. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘राखीला आधी पाकिस्तानला पाठवा’. तसेच तिसऱ्याने लिहिले, ‘हे योग्य नाही.’ असे कंमेंट करून अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
‘Sitaare Zameen Par’ च्या कमाईत घट, ‘Kuberaa’ देखील कमाई मागे; जाणून घ्या नवे कलेक्शन
दिलजीत दोसांझने दिले स्पष्टीकरण
‘सरदार जी ३’ मध्ये हानिया आमिरच्या कास्टिंगवरून वाढत्या वादावर दिलजीत दोसांझ यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात झाले होते. शूटिंगच्या वेळी सर्व काही ठीक होते. त्यानंतर अनेक मोठ्या गोष्टी घडल्या आहेत. गायकाने असेही सांगितले की चित्रपटात खूप पैसे गुंतवले गेले आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित न होता परदेशात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता या चित्रपटाच्या रिलीजवर सध्या वाद सुरु आहे.