नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, जयपूर
राजस्थानातील वाळवंटात नुकताच एक नैसर्गिक चमत्कार पहावयास मिळाला आहे. तेथे चक्क वाळूचे कारंजे आणि झरे निर्माण झाले आहेत. अर्थात यात काही दैवी चमत्कार वगैरे नसून हा निसर्गाचाच एक आविष्कार आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात ‘महाबार नामक एका स्थानी हे दृश्य दिसून आले.
येथे उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या वेगाने वारे वाहतात. उन्हामुळे वाळू तापून तिच्या लगतची हवा विरळ बनते. त्यामुळे ती भरून काढण्यासाठी हवेचे झोत जमिनीकडे येऊ लागतात. या प्रक्रियेत वाळवंटातील वाळू वर उचळली जाते आणि वाळूचा कारंजा उडत असल्याचे दृश्य दिसते. काही ठिकाणी याच प्रक्रियेमुळे वाळू जमिनीवरून झऱ्यासारखी वाहाताना दिसते.
[read_also content=”Shivrajyabhishek Day Special 2021: हुंकार सार्वभौमत्वाचा, स्वाभिमानाचा! https://www.navarashtra.com/latest-news/shivrajyabhishek-day-special-2021-the-roar-of-sovereignty-of-self-respect-nrvb-138612.html”]
प्रत्येक उन्हाळ्यात हे दृश्य दिसतेच असे नाही. यंदा येथे ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने निसर्गाची ही पोकळी किमया लोकांना पाहता आली. वाळूच्या या कारंज्यांचे आणि झऱ्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले. यावेळी उन्हाळ्यात वाळवंटातील तापमान नेहमीपेक्षा थोडे अधिक होते. त्यामुळे अशी दृश्ये दिसली, असे तज्ज्ञांचे मत आहे. वाळूचे कण सुटे सुटे असल्याने अशी दृश्ये वाळवंटात दिसून येतात.
[read_also content=”तुम्ही वाहनधारक असाल तर लगेचच करा हे काम अन्यथा होईल डोक्याला शॉट; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया https://www.navarashtra.com/automobile/driving-license-link-with-aadhaar-card-otherwise-there-will-be-headaches-for-you-know-the-whole-process-nrvb-138609.html”]
Sand fountains are flowing in the desert Find out the exact reason