• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Sanjay Shejwal Interview About Eklavya Cinema Nrsr

‘एकलव्य’मध्ये संजयचा ग्रे शेडेड सत्या

कायम सकारात्मक भूमिकांमध्ये दिसणाऱ्या काही कलाकारांनाही ग्रे शेडेड आणि निगेटीव्ह भूकिमांचं आकर्षण असतंच. आपल्यालाही कधीतरी ग्रे शेडेड किंवा निगेटीव्ह कॅरेक्टर करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. ‘एकलव्य’ (Eklavya)या आगामी चित्रपटानं संजय शेजवळची(Sanjay Shejwal Interview) ही इच्छा पूर्ण केली आहे. या निमित्त संजयनं ‘नवराष्ट्र’शी साधलेला एक्सक्लुझीव्ह संवाद...

  • By संजय घावरे
Updated On: Oct 27, 2021 | 04:44 PM
Sanjay Shejwal
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संजयनं आजवर ‘ताटवा’, ‘डोम’, ‘सौभाग्य’, ‘प्रेम पहिलं वहिलं’ आणि ‘इभ्रत’ या चित्रपटांमध्ये पॅाझिटीव्ह कॅरेक्टर्स साकारली आहेत. त्याचा ‘इभ्रत’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्या ‘एकलव्य’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मराठी चित्रपटांसोबत ‘डीथ्री – दोस्ती दिल धोखा’ हा तेलुगू चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

‘एकलव्य’बाबत संजय म्हणाला की, मी पहिल्यांदाच ग्रे शेडेड कॅरेक्टर केलं आहे. ‘एकलव्य’ची पुराणातील कथा आपण सर्वांनीच ऐकली असेल. गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिलेलं ज्ञान एकलव्यानं त्यांना न सांगता ग्रहण करत स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध केल्यानंतर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सपोर्ट केल्यानं एकलव्यवर अन्याय झाल्याचं आपण महाभारतात पाहिलं आहे. ‘एकलव्य’ची कथाही त्याच पार्श्वभूमीवरील आहे. आताच्या सिच्युएशनमध्येही एकलव्यावर कसा अन्याय होतोय ते यात पाहायला मिळेल. हे सर्व आपल्या इंडस्ट्रीत कसं घडतंय त्याचं चित्र ‘एकलव्य’ या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. थिएटर आणि फिल्म इंडस्ट्रीतील वातावरणावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. इथं ज्याची जितकी क्षमता असते तेवढं त्याला मिळतंच असं नाही. गॅाडफादर असणाऱ्यांना लगेच ब्रेक मिळतो. मग भले त्याची क्षमता नसली तरीही त्याला जगासमोर आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळते. हे सर्व चित्र ‘एकलव्य’ या चित्रपटात मनोरंजक पद्धतीनं रेखाटण्यात आलं आहे. पहिल्यांदा फिल्ममध्ये थिएटर बघायला मिळेल. यात गुरुकुलमधील वातावरण आहे. जिथं वेगवेगळ्या शैलीतील थिएटर्स शिकवली जातात. मी नाट्यशास्त्रातून एमए केल्यानं या चित्रपटाबाबत मला खूप अप्रूप वाटलं. कारण मी दोन वर्षे थिएटर जगलो आहे. ग्रीक रंगभूमी, संस्कृत नाट्यशास्त्र, शेक्सपिअर स्टाईल, थिएटरमधलं पॅालिटीक्स, कॅरेक्टर मिळवण्यासाठी धडपड, एकमेकांसोबतची चुरस, हॅास्टेल लाईफ हे सगळं पुन्हा जगण्याची संधी ‘एकलव्य’नं दिली. फिल्म करताना थिएटर जगण्याचा वेगळा अनुभव मिळाला.

वामन सरांसोबत काम केल्याचा फायदा
वामन केंद्रे सरांकडे नाट्याशास्त्राचे धडे गिरवल्याचा खूप फायदा झाला. विशेषत: या चित्रपटात काम करणं सोपं झालं. कमर्शिअल अभिनेत्यांना खरं तर नाट्यशास्त्रात शिकवल्या जाणाऱ्या काही विशिष्ट शैली माहितच नसतात. आपलं संस्कृत नाट्यशास्त्र प्रॅापर अभ्यास केल्यावरच समजतं. कमर्शिअल नाटकांमधील नटांना याबाबत फार माहित नसतं. त्यांच्या तुलनेत ती बॅाडीलँग्वेज, ते व्हॅाईस कल्चर, त्या मुद्रा करणं मला खूप इझी गेलं. याशिवाय ग्रीक स्टाईलच्या एका नाटकावरील थोडा पॅच आणि त्यावर डिस्कशन चित्रपटात केलं आहे. मी नाट्यशास्त्राचा अभ्यास केल्यानं इतरांच्या तुलनेत मला ते फार ईझी गेलं. कारण त्यांना रिॲलिस्टीक करण्याची सवय असते. मी रिॲलिस्टीकही करतो आणि नॅान रिॲलिस्टीकही…

ती शैली फॉलो करतो
वामन केंद्रेसरांची शिकवण्याची एक अनोखी शैली आहे. ते कोणत्याही नटाला त्याच्या शैलीत नव्हे, तर कॅरेक्टरच्या शैलीत बिल्ट करतात. ते ज्या पद्धतीनं करायचे ती प्रोसेस मला खूप छान वाटते. ती मी नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं मग कॅरेक्टर दिसतं. ती व्यक्ती किंवा ॲक्टर दिसत नाही. वामनसर बॅाडीलँग्वेजच्या माध्यमातून अधिक काम करतात. बॅाडीलँग्वेज, कॅास्च्युमच्या माध्यमातून कॅरेक्टर बिल्ट करून मग व्हॅाईस आणि टेक्स्चर करण्याची वामनसरांची स्टाईल मला खूप भावते. मी तीच फॅालो करण्याचा प्रयत्न करत असतो.

त्यांचा माझ्यावर विश्वास होता
डॅा. सुधीर निकम यांनी या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. आम्ही ‘इभ्रत’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यांनी त्या चित्रपटात ॲक्टींगही केली आहे. त्यांना माझं ‘इभ्रत’मधलं काम फार आवडलं. त्यामुळं त्यांनी मला दुसऱ्या एका चित्रपटाची ऑफर दिली होती. ती फिल्म भविष्यात येणार आहे, पण अचानक हा सिनेमा करण्याची योजना पुढे आल्यानंतर त्यांनी मला स्टोरी आणि कॅरेक्टरबाबत सांगितलं. हे कॅरेक्टर करायला तू इंटरेस्टेड आहेस का? असं त्यांनी मला विचारलं. हे कॅरेक्टर थोडं वेगळं आहे. आजवर मी पॅाझिटीव्ह रोल्स केले आहेत. त्यामुळं ग्रे शेडेड कॅरेक्टरमधील चॅलेंज स्वीकारायचं ठरवलं. निकम यांना अपेक्षित असलेलं सर्व माझ्या कॅरेक्टरमध्ये मिळालं.

तो माज दिसायला हवा
सत्या नावाचं कॅरेक्टर साकारलं आहे. ग्रे शेडेड कॅरेक्टर करताना खूप बॅलन्स ठेवावा लागतो. कारण एकदमही निगेटीव्ह होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. खरं तर मी साकारलेलं कॅरेक्टर कथानकातील सिच्युएशननुसार वागतंय म्हणून ते ग्रे शेडेड वाटतंय. कुठेही खोटा आव आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. सत्या जितका रिअल वाटेल तितका रिअल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ऑडीयन्सनाही आता भपकेबाज कॅरेक्टर्स पटत नाहीत. त्यामुळं भडकपणा दाखवलेला नाही. मी नेहमीच काही ॲक्टर्सना फॅालो करण्याचा प्रयत्न करत असतो. विल स्मिथ माझा फेव्हरेट ॲक्टर आहे. मार्लन ब्रँडो माझा आयडॅाल आहे. हे कलाकार त्या सिच्युएशनमध्ये कसं डील करतात हे लक्षात घेतो. ते ॲग्रेसिव्ह किंवा ग्रे शेडेड वाटतात, पण त्या सिच्युएशनमुळं तसं वागताहेत हे जाणवतं. त्यामुळं मी त्यांना खूप ऑब्जर्व्ह करून फॅालो करण्याचा प्रयत्न करतो. कॅरेक्टरसाठी आवश्यक ॲटीट्यूड, बॅाडीलँग्वेज, लुक कॅरी करणं या गोष्टींवर बारकाईनं काम करतो. तो माज दिसायला हवा.

चढाओढ, स्पर्धा आणि द्वंद्व
मी साकारलेला सत्या चित्रपटात ॲक्टर आहे. याच्यासमोर असलेल्या पॅाझिटीव्ह कॅरेक्टरमधील द्वंद्व यात रेखाटण्यात आलं आहे. याला सर्व ईझीली मिळतंय, पण त्याला मिळत नाहीय. त्यामुळं चढाओढ सुरू आहे. कॅाम्पिटीशन्स असल्यानं एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार होतो. दुसऱ्याला पाडायचं, आपण कसं पुढं जायचं यासाठीची रणनीती ठरवली जाते. आपलं कॅरेक्टर मिळवण्यासाठीची धडपड या चित्रपटात आहे. या चित्रपटात रोमान्सही आहे, पण त्याबाबत जास्त काही सांगणार नाही. कारण तोच धागा पकडून थोडं एक्स्ट्राही यात पाहायला मिळणार आहे. थोडा सुखद, आश्चर्याचा धक्का देणारंही काहीतरी आहे. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग औरंगाबादमध्ये झालं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे.

ज्येष्ठ कलाकारांसोबत सुरेख अनुभव
प्रिया बेर्डे यांनी या चित्रपटात माझ्या आईची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप छान वाटलं. त्यांचा स्वभाव खूप फ्रेंडली असल्यानं काम करताना कधीच एका मोठ्या अभिनेत्रीसोबत काम करत असल्याचं जाणवलं नाही. त्यांच्या ठिकाणी कधीच मोठेपणाचा आव नव्हता. हसत-खेळत, गप्पा मारत, गॅासिप करत आम्ही आमचं काम केलं. मकरंद देशपांडेंसोबत काम करताना खूप वेगळा अनुभव मिळाला. स्क्रिप्ट व्यतिरीक्त ऑन द स्पॅाट सीन कसे इम्प्रोवाईज करायचे हे त्यांच्यासोबत काम करताना शिकायला मिळालं. आम्ही जे बदल केलं ते दिग्दर्शकांनाही पटल्यानं चित्रपटात पहायला मिळतील. माणूस म्हणून ते खूप डाऊन टू अर्थ आहेत. त्यांनी हिंदी सिनेसृष्टी आणि जास्त करून थिएटरवर काम केल्यानं त्यांच्याबद्दल आदर आहे. संदिप पाठक, संजय कुलकर्णी, जानकी पाठक, विजय गीते आदी कलाकाराही आहेत. मधुमंजूल आर्टस या भोजपूरी सिनेसृष्टीत सक्रीय असलेल्या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. दिग्दर्शन डॅा. सुधीर निकम यांनीच केलं आहे. आजवर त्यांनी बऱ्याच चित्रपटांचं लेखन केलं आहे.

Web Title: Sanjay shejwal interview about eklavya cinema nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2021 | 04:43 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

Nov 16, 2025 | 09:51 AM
Astrology: शनि आणि राहूच्या संक्रमणाचा सर्वांत जास्त परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार, जाणून घ्या

Astrology: शनि आणि राहूच्या संक्रमणाचा सर्वांत जास्त परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार, जाणून घ्या

Nov 16, 2025 | 09:50 AM
थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने करा कोरफडचा वापर, कोंडा गायब होऊन केस होतील मऊ

थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने करा कोरफडचा वापर, कोंडा गायब होऊन केस होतील मऊ

Nov 16, 2025 | 09:46 AM
Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल

Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल

Nov 16, 2025 | 09:41 AM
IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?

IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?

Nov 16, 2025 | 09:25 AM
Pune Crime News: पाकिस्तानी, ओमानचे नंबरशी? पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Pune Crime News: पाकिस्तानी, ओमानचे नंबरशी? पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Nov 16, 2025 | 09:24 AM
Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

Nov 16, 2025 | 09:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM
Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Nov 15, 2025 | 06:22 PM
Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Nov 15, 2025 | 06:17 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.