जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्हा पासून सुरू झालेला आहे. त्या यात्रेच्या आज चोपडा तालुक्यात कार्यक्रम होणार होते. परंतु, भारतरत्न लतादीदी यांच काल निधन झाल्याने राज्य सरकारने एक दिवसाच्या दुखवटा जाहीर केल्याने हा कार्यक्रम चोपड्यात स्थगित करण्यात आला होता. परंतु, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील ३५८ तालुके आणि २७ महानगरात पवार साहेबांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.