Ajit Pawar Plane Crash : सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अजितदादा होते सर्वांचे लाडके (संग्रहित फोटो)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामतीत कोसळले. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही या दरम्यान मृत्यू झाला. मुंबईहून ते बारामती येथे प्रचारासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची टीमही होती. त्यांच्या या निधनाने सर्वच क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही जणांचा मृत्यू झाला. लँडिंगदरम्यान विमान अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार एका कार्यक्रमासाठी बारामतीला जात होते. अजित पवार आज (बुधवार) जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला आले होते, असे वृत्त आहे. मात्र, विमानतळावर लँडिंग करताना विमान अपघात झाला. घटनास्थळाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. अजित पवार यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार हे फक्त राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते तर त्यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांशी चांगले संबंध होते. अजित पवारांना लोक आदराने दादा म्हणून संबोधत असत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अजितदादा पवार हे सर्वांचे लाडके होते.
दरम्यान, अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचे समजताच अग्निशामन दल आणि कार्यकर्त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. अपघाताबाबत माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांना प्रवाशांना जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
जनतेशी जोडलेला नेता
अजित पवार यांनी राजकारणात विशेष अशी ओळख निर्माण केली होती. नेतेमंडळींपासून ते अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील अजित पवारांना भेटू शकत होता. जेव्हा एखादं काम करणार असं म्हटलं की ते करणारच, अशी ख्याती दादांची होती. अजितदादा पवार हे जनतेशी जोडलेले नेते होते. त्यांच्या जाण्याने फक्त राजकीयच नाहीतर सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांचे विमान का कोसळले? विमान वाहतूक तज्ज्ञांनी उघड केली ७ प्रमुख कारणे






