मुंंबई : रशियाने युक्रेन युद्धावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत आणि यात आता बॉलीवूडचा सर्किट अर्थात अर्शद वारसीदेखील मागे नाही. अर्शद वारसीने (Arshad Warsi) त्याच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. अर्शदने सोशल मीडियावर एक मीम शेअर करत जर्मनी-रशिया-युक्रेन-यूएसए या देशांमध्ये सुरु असलेली परिस्थिती कशी असेल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्शदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे मीम शेअर केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल (Golmaal) या चित्रपटावरं असलेलं हे मीम आहे. हे मीम शेअर करत जर्मनी-रुस-यूक्रेन-अमेरिका-फ्रान्स या देशांची परिस्थिती दाखवली आहे. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला (Sharman Joshi)अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचे दाखवले आहे. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला आहे. जिथे रिमीला पाहता पाहता गुंडांसमोर अडकतो आणि बाकी सगळे पळून जातात. यात अजय देवगण आणि शर्मन जोशी हे देखील त्याच्यासोबत आहेत. पण जसं समोर त्यांना गुंड दिसतात आणि ते आता कर्ज मागणार हे त्यांच्या लक्षात येतं ते पळून जातात, पण अर्शद गुंडांच्या जाळ्यात अडकतो. हे मीम शेअर करत ‘गोलमाल हा काळाच्या खूप पुढे होता, हे यावरून कळतंय’, असे कॅप्शन दिले आहे.