फ्लोरिडा (अमेरिका) : जर तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात आणि अचानक त्यामध्ये कोट्यवधी रुपये असल्याचे आढळले तर हे पैसे कुठून आले याची भीती तुम्हालाही वाटेल. अमेरिकेतील फ्लोरिडामध्येही असेच काहीसे घडले. मागच्या शनिवारी लार्गो (Largo) येथे ज्युलिया योनकोव्स्की (Julia Yonkowski) काही पैसे काढण्यासाठी एका स्थानिक चेस बँकेत (Chase Bank) गेली, पण तिला आधी तिचा खात्यातील ताळेबंद पहायचा होता.
एटीएममधून प्राप्त झालेल्या बँक पावतीनुसार ज्युलिया योनकोव्स्कीच्या खात्यात 74 999,985,855.94 म्हणजेच 177417 कोटींपेक्षा जास्त रुपये होते. हे माहिती पडल्यावर तिला आश्चर्य वाटले. तरीही, त्याच्या खात्यात इतके पैसे कुठून आले? ती म्हणाली, “अरे देवा, मला खूप भीती वाटली. मला माहिती आहे की, बहुतेक लोक असा विचार करतील की, लॉटरी लागली आहे, परंतु मला खूप भीती वाटली.
[read_also content=”नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; सिडको घेराव आंदोलन, दि बा पाटलांच्या समर्थनार्थ दाखवले झेंडे https://www.navarashtra.com/thane/airport-naming-controversy-cidco-gherao-protest-in-navi-mumbai-know-the-details-nrvb-146589.html”]
जुलिया फक्त 20 डॉलर्स काढण्यासाठी एटीएममध्ये गेली. तिने सांगितले की, मशीनकडून 20 डॉलर परत काढण्याचा मेसेज येताच हे पैसे उपलब्ध होतील पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तिने अशा घोटाळ्यांविषयी ऐकले होते, यामुळे तिने कोणताही व्यवहार केला नाही. यानकोव्स्कीने सांगितले की मला भीती वाटली कारण सायबर क्राइमही होऊ शकतो.
[read_also content=”है तय्यार हम : तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेने कसली कंबर; मुलांसाठी स्वतंत्र विभाग जुलैअखेरपर्यंत होणार तयार : अतिरिक्त आयुक्तांची माहिती https://www.navarashtra.com/latest-news/mumbai-municipal-corporation-is-ready-for-the-third-wave-of-coronavirus-separate-section-for-children-to-be-ready-by-end-of-july-additional-commissioner-nrvb-146575.html”]
ती तात्पुरती अब्जाधीश झाली आहे हे समजताच तिने चेस बँकेच्या एटीएममध्ये जाऊन अनेक वेळा तपासणी केली. तथापि, दोन दिवसानंतर, अब्ज डॉलर्सच्या या अनोख्या कथेचा चेस बँकेने शेवट केला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी डब्ल्यूएफएलए या न्यूज वेबसाइटला माहिती दिली की, ज्युलियाचे बँक खात्यात शिल्लक आधीच शून्य आहे. कोणत्याही बँक खात्यात संशयास्पद घटना घडल्यास अशा प्रकारचे नंबर्स वापरले जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.
she went to withdraw only 20 doller from atm got 7417 crore in chase bank account Florida Amaerica