मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती (Shivjayanti) ही मराठी माणसांनी ३६५ दिवस साजरी करण्याचा सण आहे. त्यामुळे ती एकत्र आज साजरी केली असली तरी चांगलेच आहे. मग ती तिथीनेच साजरी व्हायला हवी, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
तिथीप्रमाणेच का, यावर सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे सर्व हिंदू सण हे आपण तिथीप्रमाणेच साजरे करतो. गेल्या वर्षी ज्या तारखेला दिवाळी असते, ती त्याच तारखेला यावर्षी साजरी होत नाही. कारण ती तिथीप्रमाणे साजरी होते. शिवजयंती हा मराठी माणसांसाठी सण आहे. त्यामुळे तो तिथीप्रमाणेच साजरा व्हायला हवा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
साकीनाका येथील मनसे शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनसैनिकांनाही मार्गदर्शन केले.