चंदीगड येथील 23 वर्षीय श्वेता शारदा (Shweta sharda) हिने मुंबईत मिस दिवा युनिव्हर्स 2023 (miss diva universe) चा फिनाले जिंकून शहराचे नाव उंचावले आहे. गेल्या वर्षी मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मॉडेल दिविता राय हिने श्वेताला मुकुट घातला. मुकुट परिधान केल्यानंतर, श्वेता आता या वर्षी नोव्हेंबरमध्ये एल साल्वाडोर येथे होणाऱ्या 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
[read_also content=”OMG! लग्नाच्या चार वर्षानंतरही मुलबाळ होत नव्हतं, आता महिलेनं दिला एकत्र चार मुलांना जन्म, दोन मुलांसह दोन मुलीचा समावेश https://www.navarashtra.com/india/women-gave-birth-to-four-children-in-tonk-rajasthan-nrps-450522.html”]
व्यवसायाने मॉडेल आणि डान्सर असलेली श्वेता शारदा चंदीगडमधील मनीमाजरा भागातील मेन बाजारची रहिवासी आहे. डान्स इंडिया डान्स, डान्स दिवाने आणि डान्स प्लस यासारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोचाही ती भाग आहे. टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासोबतच तिने झलक दिखला जा मध्ये कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे.
श्वेताला मिळालेल्या यशामुळे तिची आई अंजू खूप आनंदी आहे. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने सांगितले की, श्वेताने तिची दहावी पर्यंत शिक्षण गव्हर्नमेंट मॉडेल स्कूल, मॉडर्न कॉम्प्लेक्स, मणिमाजरा येथून केलं. त्यानंतर सेक्टर-18 येथील सरकारी मॉडेल स्कूलमधून बारावीपर्यंतच शिक्षण घेतलं. आता ती मॉडेलिंगसह इग्नूमधून बीए करत आहे. अंजूने सांगितले की, ती टीव्ही शोमध्ये काम करण्यासाठी 2017 पासून मुंबईत राहते.
डान्स शिकल्यानंतर संतापलेले वडील वेगळे राहतात
अंजू यांनी सांगितले की, श्वेताला नृत्याचे कौशल्य गॉड गिफ्ट म्हणून मिळाले आहे. तिचे टॅलेंट पाहून वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी श्वेताला डान्स शिकण्यासाठी अकादमीत पाठवले, पण तिच्या वडिलांना ते आवडले नाही, त्यामुळे ते रागावले आणि 2015 मध्ये कुटुंबापासून वेगळे राहू लागले. अंजूने सांगितले की, त्यानंतरही तिने हिंमत हारली नाही आणि श्वेताला तिच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी धडपड केली. त्यांचा मुलगा जतीन फरीदाबादमध्ये कॅनरा बँकेत काम करतो.
चंदीगड युथ असोसिएशनचे प्रमुख अंकित अरोरा म्हणाले की, श्वेता शारदाच्या यशाचा संपूर्ण शहराला अभिमान वाटत आहे. श्वेताने तिच्या कुटुंबासह मनीमाजरा आणि चंदीगडला देशभरात नावलौकिक मिळवून दिला आहे. भाजप चंदीगडचे अध्यक्ष अरुण सूद यांनीही श्वेताचे अभिनंदन केले आणि आजचा दिवस चंदीगड-मणीमाजरा साठी आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले. याशिवाय त्यांच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली होती.