पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटजवळ सोमवारी सकाळी ६ गाड्यांमध्ये मोठा अपघात झाला. यात ३ कार, एक प्रायव्हेट बस, एक टेम्पो आणि एका ट्रेलर एवढ्या गाड्यांना अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या सहाही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे एक्सप्रे वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान अपघातात मृत्यमुखी पडलेले तिघेही जण एकाच कारमधील आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोंबड्या घेऊन जाणाऱअया ट्रकला पहिल्यांदा एका कारने धडक मारली. या कारच्या पाठोपाठ असलेल्या भरधाव ट्रेलरने कारला उडविले. यामुळे या दोन्ही मोठ्या गाड्यांमध्ये सापडलेल्या कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघातानंतर या कारमधील तिघांचे मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रय़त्न करावे लागले. दोन्ही मोठ्या वाहनांच्या मध्ये सापडलेल्या कारला कापून यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी हायवे पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम दाखल झाली असून, मदत कार्य सुरु आहे. ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रक डाह्वरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन मोठ्या गाड्यात सँडविच झालेली कार ही पुण्याहून मुंबईकडे जात होती.