मुंबई : ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहेत. या चित्रपटाचे हाऊसफुल शोची बातमी ऐकून या चित्रपटातील कलाकार अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांना प्रचंड आनंद झालाय.
या आनंदाच्या भरात अमेय आणि ललित अतरंगी डान्स करू लागले. अमेय आणि ललितचा हा डान्स व्हिडीओ दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. अमेय आणि ललितच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
‘झोंबिवली’ हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मराठीतला पहिला वहिला झोंबी सिनेमा आहे.