KKR Vs GT Live Toss (फोटो - ians)
शुभमन गिल अन् अजिंक्य रहाणे येणार आमने सामने
केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा दिवस
Tata IPL 2026 GT Vs KRR Toss Live Updates: थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मॅच होणार आहे. आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. केकेआरला अद्याप विजयाचे खाते (IPL 2026) उघडता आलेले नाही. आजच्या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाचा हंगाम कोलकाता नाइट रायडर्ससाठी चांगले गेलेले नाहीये. केकेआरला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाहीये. 5 पैकी 5 सामन्यात केकेआरचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा काहीही करून त्यांना सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आज केकेआरचा संघ कसा खेळ करतो ते पहावे लागणार आहे.
दुसरीकडे, गुजरात टायटन्स आतापर्यंत 4 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने पहिले दोन सामने गमावले आहेत. तर पुढील 2 सामने गुजरातने जिंकले आहेत. साई सुदर्शन, जोस बटलर आणि गुजरतची गोलंदाजी जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्यातरी गुजरात टायटन्सचे पारडे मजबूत दिसून येत आहे.
GT Vs KKR Pitch Report: अहमदाबादमध्ये कोणाचं पारडं जड? फलंदाजीसाठी नंदनवन की गोलंदाज लावणार सापळा…?
हेड टू हेड रेकॉर्ड
गुजरात टायटन्स अन् केकेआर आयपीएलच्या इतिहासात 5 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये 3 सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत. तर केकेआर 1 सामना जिंकला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. दरम्यान हेड टू हेड रेकॉर्डमध्ये गुजरात टायटन्सचे पारडे मजबूत दिसत आहे. केकेआरचा खेळाडू कॅमेरून ग्रीनने चांगली खेळी केलेली नाहीये. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिच रिपोर्ट
नरेंद्र मोदी स्टेडियमवर असणारी खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची शक्यता जास्त निर्माण होते. या खेळपट्टीवर गोलंदाजांना देखील सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मदत मिळू शकते. तसेच आज अहमदाबादमधील हवामान स्वच्छ आणि मोकळे राहण्याचा अंदाज आहे. तसेच या ठिकाणी पावसाची शक्यता देखील नाहीये. त्यामुळे आजचा सामना ठराविक वेळेत सुरू होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे असणारे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षक एका वेळेस सामना पाहू शकतात. या स्टेडियमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.
GT Vs KKR Playing 11: कॅमेरून ग्रीनचा पत्ता कट होणार की…? काय आहे हेड टू हेड रेकॉर्ड?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार , अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन,अंगकृष रघुवंशी, कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती






