GT Vs KKR Live Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
गुजरात विरुद्ध केकेआर आमनेसामने
केकेआरच्या संघात बालद होण्याची शक्यता
अहमदाबादमध्ये 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 GT vs KKR Live: आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल आणि केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. केकेआरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा (IPL2026) असणार आहे. दोन्ही संघांची प्लेइंग 11 जाणून घेऊयात.
हेड टू हेड रेकॉर्ड
गुजरात टायटन्स अन् केकेआर आयपीएलच्या इतिहासात 5 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये 3 सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत. तर केकेआर 1 सामना जिंकला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. दरम्यान हेड टू हेड रेकॉर्डमध्ये गुजरात टायटन्सचे पारडे मजबूत दिसत आहे. केकेआरचा खेळाडू कॅमेरून ग्रीनने चांगली खेळी केलेली नाहीये. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
GT Vs KKR Pitch Report: अहमदाबादमध्ये कोणाचं पारडं जड? फलंदाजीसाठी नंदनवन की गोलंदाज लावणार सापळा…?
2026 च्या हंगामात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अजिंक्य रहाणेला अजून केकेआरसाठी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत केकेआर 5 सामने खेळले असून 4 सामने हरले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे केकेआरला एक गुण देण्यात आला होता. सध्या केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे.
पिच रिपोर्ट
नरेंद्र मोदी स्टेडियमवर असणारी खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची शक्यता जास्त निर्माण होते. या खेळपट्टीवर गोलंदाजांना देखील सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मदत मिळू शकते. तसेच आज अहमदाबादमधील हवामान स्वच्छ आणि मोकळे राहण्याचा अंदाज आहे. तसेच या ठिकाणी पावसाची शक्यता देखील नाहीये. त्यामुळे आजचा सामना ठराविक वेळेत सुरू होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे असणारे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षक एका वेळेस सामना पाहू शकतात. या स्टेडियमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.
GT Vs KKR Playing 11: कॅमेरून ग्रीनचा पत्ता कट होणार की…? काय आहे हेड टू हेड रेकॉर्ड?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार , अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन,अंगकृष रघुवंशी, कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती






