Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर

एसआरएचच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीकडून आक्रमक खेळी करणाऱ्या वेंकटेश अय्यरला 44 रन्स वर आउट करण्यात यश मिळवले. एशान मलिंगाने त्याला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 22, 2026 | 11:37 PM
RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर
Follow Us
Close
Follow Us:

एसआरएचने आरसीबीला दिलेळे 256 रन्सचे टार्गेट 
पॉवर प्लेमध्ये आरसीबीने गमावल्या 2 विकेट्स
एसआरएच पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर 

Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: आज हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना खेळवला गेला. आयपीएलच्या साखळी सामन्यांचा हा शेवटचा आठवडा आहे. एसआरएचने इशान किशन आणि अभिषेक शर्माच्या खेळीच्या जोरावर आरसीबीला 256 रन्सचे टार्गेट दिले होते. दोन्ही संघ क्वालिफाय झाले आहेत. टॉप 2 साठी एसआरएचचा सामना महत्वाचा आहे. अखेर या सामन्यात एसआरएचने आरसीबीवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. एसआरएचने सामना जिंकला असला तरी देखील त्यांना टॉप 2 मध्ये जाता आलेल नाही. एसआरएच पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता चौथ्या स्थानी येणाऱ्या संघासओबात एसआरएचचा संघ एलिमिनेटर खेळणार आहे.

आरसीबीची फलंदाजी

एसआरएचने दिलेल्या 256 रन्सचे बलाढ्य टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून डावाची सुरूवात विराट कोहली आणि वेंकटेश अय्यरने केली. मागील सामन्याप्रमाणे वेंकटेश अय्यरने आक्रमक खेळी केली. एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. अखेर 4 सिक्स आणि 4 फोर मारून 44 रन्सवर असताना अय्यर आउट झाला.  अय्यर आउट झाल्यावर फॉर्ममध्ये असणारा देवदत्त पाडीकल खेळण्यासाठी आला. विराट कोहलीने सावध सुरूवात केली होती. मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. विराट कोहली 15 रन्स करून आउट झाला. देवदत्त पडीकलने 21 रन्स केल्या. कर्णधार रजत पाटीदारने शानदार 56 रन्सची खेळी केली.

Eshan Malinga with the breakthrough! 👊#RCB lose their first wicket ☝️ Updates ▶️ https://t.co/ZcxjefgalG#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRCB pic.twitter.com/PlPXTBcXW6 — IndianPremierLeague (@IPL) May 22, 2026



एसआरएचची गोलंदाजी 

एसआरएचच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीकडून आक्रमक खेळी करणाऱ्या वेंकटेश अय्यरला 44 रन्स वर आउट करण्यात यश मिळवले. एशान मलिंगाने त्याला आउट केले. तर साकीब हुसेनने विराट कोहलीला आउट केले. एशान मलिंगाने पडीकलला आउट केले. ट्रेविस हेडने रजत पाटीदारला आउट केले.

एसआरएचची फलंदाजी

एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने एसआरएचची सुरुवात केली. ट्रेविस हेडने पॉवर प्ले मध्ये शानदार सुरूवात केली त्यावेळेस अभिषेक शर्मा एका बाजूने सावकाश डाव सांभाळत होता. ट्रेविस हेड 26 रन्स करून आउट झाला. तर त्यानंतर खेळण्यासाठी इशान किशन मैदानात आला. अभिषेक शर्माने शानदार आक्रमक खेळी करत अर्धशतक लगावले. तो 56 रन्स करून आउट झाला. नंतर इशान किशनने आणि हेनरी क्लासेनने एसआरएचला 200 च्या पार पोहोचवले. हेनरी क्लासेनने शानदार अर्धशतक केले. तो 51 रन्स करून आउट झाला. किशन आणि क्लासेनने 100 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डीने शानदार फलंदाजी करत एसआरएचला 250 पार पोहोचवले.

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट

आरसीबीची गोलंदाजी

आरसीबीकडून गोलंदाजीची सुरूवात भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने केली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. रसिख डारने आक्रमक खेळणाऱ्या ट्रेविस हेडची महत्वाची विकेट पटकावली. पाठोपाठ लेग स्पिनर सुयश शर्माने अभिषेक शर्माला आउट केले. कृणाल पंड्याने आरसीबीसाठी घातक ठरणारी जोडी फोडली. त्याने क्लासेनला 51 रन्सवर आउट केले.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे.

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 srh beat rcb by 56 runs rajat patidar play off matches live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 11:33 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • SRH vs RCB

संबंधित बातम्या

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट
1

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
2

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम
3

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’
4

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.