SRH vs RCB Live Streaming (फोटो- ट्विटर)
एसआरएचचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने केली शानदार सुरूवात
अभिषेक शर्मा वादळी खेळी करून झाला आउट
Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना सुरू आहे. दोन्ही संघ क्वालिफाय झाले आहेत. एसआरएचने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने चांगली सुरूवात केली. अखेर प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने 255 रन्स केल्या आहेत. आरसीबीला विजयासाठी 256 रन्सची गरज असणार आहे.
एसआरएचची फलंदाजी
एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने एसआरएचची सुरुवात केली. ट्रेविस हेडने पॉवर प्ले मध्ये शानदार सुरूवात केली त्यावेळेस अभिषेक शर्मा एका बाजूने सावकाश डाव सांभाळत होता. ट्रेविस हेड 26 रन्स करून आउट झाला. तर त्यानंतर खेळण्यासाठी इशान किशन मैदानात आला. अभिषेक शर्माने शानदार आक्रमक खेळी करत अर्धशतक लगावले. तो 56 रन्स करून आउट झाला. नंतर इशान किशनने आणि हेनरी क्लासेनने एसआरएचला 200 च्या पार पोहोचवले.
हेनरी क्लासेनने शानदार अर्धशतक केले. तो 51 रन्स करून आउट झाला. किशन आणि क्लासेनने 100 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डीने शानदार फलंदाजी करत एसआरएचला 250 पार पोहोचवले.
SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
आरसीबीची गोलंदाजी
आरसीबीकडून गोलंदाजीची सुरूवात भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने केली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. रसिख डारने आक्रमक खेळणाऱ्या ट्रेविस हेडची महत्वाची विकेट पटकावली. पाठोपाठ लेग स्पिनर सुयश शर्माने अभिषेक शर्माला आउट केले. कृणाल पंड्याने आरसीबीसाठी घातक ठरणारी जोडी फोडली. त्याने क्लासेनला 51 रन्सवर आउट केले.
Abhi-SHAKE-ing things up and how! 🫨🔥 The #SRH opener departs after 56(22) 🧡 Updates ▶️ https://t.co/ZcxjefgalG#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRCB pic.twitter.com/VEaWnjBxJp — IndianPremierLeague (@IPL) May 22, 2026
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे.
भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा.






