Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tatkal Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

Tatkal Ticket booking rules: भारतीय रेल्वेने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी पहिला आरक्षण चार्ट प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तयार केला जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 02:57 PM
Tatkal Booking, Indian Railways

Tatkal Booking, Indian Railways

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाकडून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेच्या नियमात महत्त्वाचे बदल
  • तत्काळ तिकीट बुक करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना सकाळी ९ ते ९:२५ या वेळेत टोकन दिले जातील
  • प्रवासाच्या ८ तासांपेक्षा कमी वेळेत तिकीट रद्द केल्यास परतावा नाही
Tatkal Ticket booking rules: पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केल्याची माहिती समोर आली आहे. तिकीट प्रकिया सुधारण्यासाठी, पश्चिम मध्य रेल्वेच्या (WCR) कोटा विभागाने आपल्या सर्व स्थानकांवर टोकन प्रणाली सुरू केली आहे. या निर्णयाचा उद्देश प्रवाशांची सोय वाढवणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि तिकीटाच्या ठिकाणी लागणाऱ्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल १९५२ रोजी स्थापन झालेला कोटा विभाग हा पश्चिम रेल्वेच्या (WIR) सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक मानला जातो. त्याचे भौगोलिक क्षेत्र प्रामुख्याने राजस्थानपर्यंत विस्तारलेले असून, त्याचे काही भाग मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही येतात.

तत्काळ आरक्षण प्रणाली : टोकन वितरणाची वेळ

कोटा विभागाच्या माहितीनुसार, वातानुकूलित (AC) श्रेणीमध्ये तत्काळ तिकीट बुक करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना सकाळी ९ ते ९:२५ या वेळेत टोकन दिले जातील. स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी, सकाळी ९:३० ते ९:५५ या वेळेत टोकन दिले जातील. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी वेळेवर बुकिंग कार्यालयात पोहोचावे, नवीन प्रणालीला सहकार्य करावे आणि पारदर्शक आरक्षण प्रक्रियेचा लाभ घ्यावा.”

JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत

भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, तत्काळ तिकीट बुकिंग विंडो ट्रेनच्या प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी उघडते. एसी क्लाससाठी तत्काळ तिकीट बुकिंग विंडो सकाळी १०:०० वाजता उघडते, तर नॉन-एसी क्लाससाठी बुकिंग विंडो सकाळी ११:०० वाजता उघडली जाते.

PRS काउंटर व्यतिरिक्त, तत्काळ प्रणालीअंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइट किंवा ॲपद्वारे देखील तिकीटे बुक केली जाऊ शकतात. ही सुविधा केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असते.

नादखुळा ! MG Motor ची नवी SUV MG Majestor गाडी लाँच; देशातल्या टॉप गाड्यांना देणार टक्कर

प्रवासाला निघण्यापूर्वी चार्ट तयार करण्याची वेळ

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी पहिला आरक्षण चार्ट प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तयार केला जाईल.

दुपारी १४:०१ ते रात्री २३:५९ या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी आणि मध्यरात्री ००:०० ते सकाळी ०५:०० या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी, पहिला आरक्षण चार्ट सुटण्याच्या वेळेच्या किमान १० तास आधी तयार केला जाईल.

प्रवासाच्या ८ तासांपेक्षा कमी वेळेत तिकीट रद्द केल्यास परतावा नाही

भारतीय रेल्वेने अलीकडेच आपले तिकीट रद्द करण्याचे धोरण सुधारित बदल केले आहेत. प्रवाशांनी त्यांच्या नियोजित प्रवासाच्या वेळेच्या ८ तासांपेक्षा कमी वेळेत रेल्वे तिकीट रद्द केल्यास त्यांना कोणताही परतावा मिळणार नाही. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी तिकीट रद्द केल्यास जास्तीत जास्त परतावा दिला जाईल. तिकीट ७२ ते २४ तासांच्या आत रद्द केल्यास, भाड्याच्या २५% रक्कम कापली जाईल. २४ ते ८ तासांच्या आत रद्द केल्यास, ५०% रक्कम कापली जाईल.

 

Web Title: Tatkal ticket booking new rules 2026 wcr kota division token system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Auto
  • auto news
  • Indian Railways
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
2

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
4

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.