सोशल मिडियाच्या वापरावरुन अनेक वाद उघडकीस आले आहेत. या आधीही व्हॉट्सॲप स्टेटसवरुन, एखाद्या ग्रुपमध्ये सामील केल्यामुळे किंवा अचानक व्हॉट्सअऍप ग्रुपमधून काढल्यामुळे वाद झालेलेल आपण पाहिलेले आहेत. परंतु आपला माजी बॉस फेसबुक रिक्वेस्ट (FB request) स्विकारत नाही म्हणून त्याच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार अमेरिकेत उघडकीस आला आहे.
या व्यक्तीचे नाव सालेब बुर्जक आहे. २९ वर्षीय सालेब बुर्जक आपल्या माजी बॉसचा प्रचंड तिरस्कार करतो. आपल्या माजी बॉसला वारंवार धमक्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. सालेबने माजी बॉसला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. पण ती रिक्वेस्ट स्विकारली नाही म्हणून दोन दिवसांनी बॉसला मारण्याची धमकी दिली होती.
[read_also content=”खुनी Mobile Number; ज्याने हा नंबर घेतला तो मेला https://www.navarashtra.com/latest-news/haunted-mobile-number-the-one-who-took-this-number-died-nrvk-72805.html”]
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर दोन दिवसांनी या व्यक्तीने आपल्या माजी बॉसला धमकी देत म्हटले की, जर माझी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही तर तुम्हाला मारुन टाकेल. या धमकीच्या काही दिवसांनी त्याने पुन्हा आपल्या बॉसला मेसेज केला की जर मला पिकअप ट्रक वापरायचा आहे आणि तुम्हाला ट्रॅकही करायचे आहे. बॉसला फोटो पाठवत तुमच्यासाठी हे चांगलं नसेल असा धमकीवजा संदेश या तरुणाने बॉसला दिला होता.
सालेबच्या एक्स बॉसच्या घरात सीसीटीव्ही असून त्याच्या फूटेजमध्ये सालेब दरवाजावर लाथ मारताना दिसला आहे. तसंच स्नॅपचॅटवर शेअर केलेल्या फोटोत घातलेल्या कपड्यांमध्येच तो होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.