भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, BNP कडून पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) ना शपथविधी समरंभासाठी विशेष निमंत्रण देण्याची तयारी सुरु आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना एक नवीन दिशा मिळून शकते, असे बीएनपीचे मत आहे. तारिक रहमान यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार हुमायूं कबीर यांनी सांगितले आहे की, नव्या सरकारला भारताशी सकारात्मक आणि परस्पर सन्माच्या आधारावर मजबूत संबंध प्रस्थातिपत करायचे आहेत. या विधानातून स्पष्ट होते की, बांगलादेशचे नवे सरकार भारताशी मैत्री करु इच्छित पाहत असून देशातील राजकारणातही बदल होत आहे.
पंतप्रधान मोदींना बांगलादेशच्या नव्या पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे. शिवाय १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान मोदींनी स्वत: तारिक रहमान यांना फोन करुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. गुप्त सुत्रांनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. तसेच पंतप्रधान मोदींनी देखील बांगलादेशातील लोकशाही आणि समावेश व्यवस्थेला भारताकडून पाठिंबा दर्शवला होता. यावरुन आणि पंतप्रधान मोदींना आमंत्रण मिळणाच्या वृत्तावरुन दोन्ही देशांतील राजकीय संबंधात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याच वेळी बीएनपीने माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाची मागणी देखील भारताकडे केली आहे. बांगलादेशात शेख हसीना यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. बीएनपीने अधिकृत पत्रात म्हटले आहे की, हसीन यांच्यावरील न्यायालयीन कारवाईमध्ये आवश्यक असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. अद्याप भारताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताचा होकार आणि नकार दोन्ही उत्तरे भारत-बांगलादेश संबंधासाठी निर्णायक ठरणार आहेत. याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम उद्भ्वण्याची शक्यता आहे.
बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा
Ans: तारिक रहमान १६ किंवा १७ फेब्रुवारीला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
Ans: सध्या BNP कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आमंत्रण देण्याची तयारी सुरु आहे. पंरतु भारताकडून पंतप्रधान मोदी शपथविधीला उपस्थित राहतील का याची अधिकृत माहिती नाही.






