मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये ढोलिदा (Dholida) गाण्याची खूपच चर्चा होते आहे. अनेक रेकॉर्ड या गाण्याने मोडले आहेत.या गाण्याने 30 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. संजय लीला भन्साळीच्या (Sanjay leela Bhansali) आगामी बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमात हे गाण चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यावर अभिनेत्री आलीया भट्टने (Aalia Bhatt) भन्नाट डान्स केला आहे. पण या गाण्यामधून आणखी एक चेहरा प्रसिध्दीच्या झोतात आला आहे आणि हे नाव मराठी आहे. हे गाणं मराळमोळ्या जान्हवी श्रीमनकरने (Jahnvi Shrimankar) गायलं आहे. आणि सध्या या गाण्याला मिळत असलेली लोकप्रियता पाहता सध्या जान्हवी हवेत आहे.
खरंतर जान्हवीने आपल्या करिअरची सुरुवात भन्साळी यांच्या ‘सावरियाँ’ (Saawariya) सिनेमातूनच केली होती. ‘सावरियाँ’मध्ये तिने कोरसमध्ये आपला आवाज दिला होता आणि आता इतक्या वर्षांनंतर ती भन्साळी यांच्याच सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत असल्यामुळे तिच्या जणू स्वर्ग दोन बोटांवर आलं आहे.
या प्रवासाबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, मी खूपच लकी आहे की, मला संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळला आहे. त्यांच्याच सावरिया सिनेमामध्ये मला कोरसमध्ये गाण्याची संधी मिळाली होती आणि आता मला गंगूबाई काठियावाडीमध्ये एक कम्पिलिट म्युझिकल साँग प्लेबॅक म्हणून करायला मिळालं याचा आनंद काही औरच आहे यामुळे आता एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे. खरंतर हे गायला थोडं कठिण आहे. यात फास्ट बिट्स आहेत. ताना आहेत. हे एक हाय एनर्जीचं साँग आहे. त्यामुळे त्या पठडीचं गाणं मला सादर करावं लागलं आणि यात मला संजय लीला भन्साळी यांचीदेखील खूप मदत झाली कारण त्यांना संगीताच प्रचंड ज्ञान आहे. ते गाण्याच्या संगीतसह त्याचा शब्दांवर बराच भर देत होते. तसंच या गाण्यात टिपीकल ‘गुजराती संगीताचा’ ठसका आहे.