• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune News Allegations And Counter Allegations In The Backdrop Of The Masap Elections

PUNE NEWS : साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षाची एन्ट्री? मसाप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनेल आणि कृती समितींकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षांचा प्रवेश होतो आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 02, 2026 | 08:14 PM
PUNE NEWS: Entry of a political party into the literary field? Allegations and counter-allegations in the backdrop of the Masap elections.

मसाप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप(

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनेल आणि कृती समितींकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षांचा प्रवेश होतो आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२१ पासून मसाप निवडणुकीचे स्वरूप बिघडत चालल्याची खंतही साहित्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनलच्या वतीने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे नाव आणि सरकारी यंत्रणेचा वापर राजेश पांडे हे साहित्य संवर्धन आघाडीच्या आडून करत असल्याचा आरोप विद्यमान कार्यकारिणीने केला. यावेळी परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनल आणि राजेश पांडे यांच्यातील झूम बैठकीचा संवाद पत्रकार परिषदेत दाखवण्यात आल्याने सायबर सुरक्षेच्या नियमांचा भंग झाल्याचा सूरही सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकारी यंत्रणांचा वापर करून साहित्य संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील, कोणताही सरकारी हस्तक्षेप होणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र संमेलनानंतर अवघ्या महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून हस्तक्षेपाचे आरोप होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा : GG vs DC, WPL 2026 : सलग चौथ्या अंतिम सामन्यावर असेल दिल्ली कॅपिटल्सचा डोळा! तर GG इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

या पार्श्वभूमीवर, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करावी आणि साहित्य संस्थांपासून राजकीय हस्तक्षेप दूर ठेवण्याबाबत निस्पृह भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने खुलासा केल्याचा दाखला देत, तसाच खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, असेही त्यांनी नमूद केले.

बेकायदेशीर सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न – धनंजय कुलकर्णी

महाराष्ट्र साहित्य परिषद कृती समितीचे धनंजय कुलकर्णी यांनी विद्यमान कार्यकारिणीवर बेकायदेशीर सत्ता टिकवून ठेवण्याचा आरोप केला. पाच वर्षांपासून सदस्य नोंदणी बंद असतानाही काही निवडक व्यक्तींना सदस्य करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच २००१ नंतरच्या निवडणूक घटनेस मान्यता नसणे, पुरस्कारांचे आमिष दाखवून साहित्यिकांवर दबाव टाकला जाणे, या मुद्द्यांवर त्यांनी टीका केली. परिवर्तन पॅनलच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत विद्यमान कार्यकारिणीने काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विरोधी पॅनलवर विनोद कुलकर्णींचा आरोप

विरोधी पॅनल समविचारी नसून पडद्यामागील शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी केला. काही उमेदवार हे केवळ प्यादे असून साहित्य परिषदेची स्वायत्तता धोक्यात आणण्याचा कट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’

बदनामीसाठी रेकॉर्डिंगचा वापर? विनोद कुलकर्णींविरोधात तक्रार

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी साहित्य संवर्धन आघाडीने आयोजित केलेल्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित केल्याप्रकरणी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र लखीचंद नन्नावरे (रा. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीसाठी रेकॉर्डिंगची कोणतीही संमती देण्यात आली नव्हती. तरीही गुपचूप रेकॉर्डिंग करून त्याचा वापर पत्रकार परिषदेत बदनामीसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखा तांत्रिक चौकशी करत आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी साहित्य संवर्धनावर चर्चा अपेक्षित आहे. मात्र विरोधक मुद्दाम राजकारण आणत उणीदुणी काढत आहेत. राजेश पांडे

Web Title: Pune news allegations and counter allegations in the backdrop of the masap elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:14 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Feb 02, 2026 | 09:39 PM
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

Feb 02, 2026 | 09:35 PM
T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

Feb 02, 2026 | 09:33 PM
जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

Feb 02, 2026 | 08:56 PM
Ahilyanagar News: जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरु! बळीराजा आक्रमक

Ahilyanagar News: जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरु! बळीराजा आक्रमक

Feb 02, 2026 | 08:48 PM
वेगवान, सुसाट अन्…! ‘Missing Link ’मुळे ‘हा’ प्रवास अत्यंत जलद होणार; बोरघाटातील धोकादायक वळणं…

वेगवान, सुसाट अन्…! ‘Missing Link ’मुळे ‘हा’ प्रवास अत्यंत जलद होणार; बोरघाटातील धोकादायक वळणं…

Feb 02, 2026 | 08:41 PM
IVF केल्यानंतर किती वेळात होऊ शकता Pregnant, तज्ज्ञांनी सांगितले तपशील; होणार नाही Confusion

IVF केल्यानंतर किती वेळात होऊ शकता Pregnant, तज्ज्ञांनी सांगितले तपशील; होणार नाही Confusion

Feb 02, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.