भारतात 'या' ऑटो कंपनीचाच बोलबाला!
कंपनीच्या या सकारात्मक कामगिरीमागे Renault Kiger आणि Renault Triber या लोकप्रिय मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. या दोन्ही कार्सच्या अलीकडील अपडेट्स आणि नव्या व्हर्जन्समुळे ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, एकत्रितपणे या मॉडेल्सच्या विक्रीत 45.3 टक्के YoY वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः तरुण ग्राहक आणि कुटुंबांसाठी योग्य ठरणाऱ्या फीचर्स, परवडणारी किंमत आणि रेनोची विश्वासार्हता यामुळे या वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे.
एकदा चार्ज करा अन् 169 किमी फिरा! Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 भारतात दाखल
रेनो इंडियाचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष फ्रान्सिस्को हिडाल्गो यांनी विक्री कामगिरीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “रेनो इंडियासाठी 2026 हे वर्ष नव्या उर्जेसह आणि स्पष्ट उद्देशासह सुरू झाले आहे. Kiger आणि Triber सातत्याने मजबूत कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगातील सर्वात मोठ्या कार रिव्हीलपैकी एक असलेल्या आयकॉनिक Duster च्या पुनरागमनामुळे देशभरात ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. आमच्या सर्व टचपॉइंट्सवर चौकशींमध्ये मोठी वाढ होत असून, 2025 च्या दुसऱ्या सहामाहीपासून आम्ही निर्माण केलेल्या विश्वासाला हे बळ देते. डस्टर परतली आहे आणि रेनो इंडियाचा पुढील अध्याय अधिक भक्कमपणे सुरू झाला आहे.”
महत्त्वाचे म्हणजे, 26 जानेवारी 2026 रोजी रेनोने न्यू जनरेशन Duster चे अनावरण केले. आधुनिक डिझाइन, आकर्षक स्टाइल आणि मजबूत SUV कॅरेक्टरसह ही कार भारतात Renault International Gameplan 2027 अंतर्गत सादर करण्यात आलेली पहिली कार ठरली आहे. ही Duster विशेषतः भारतीय बाजाराच्या गरजांचा विचार करून विकसित करण्यात आली असून, तिच्यातील सुमारे 90 टक्के घटक ‘Made for India’ आहेत.
तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार
सुरक्षिततेच्या दृष्टीने ही SUV 5-स्टार सेफ्टी स्टँडर्ड्ससाठी इंजिनीअर्ड करण्यात आली आहे. यामध्ये 14 बेस्ट/फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर्स देण्यात आले असून, त्यात अॅप्रोच आणि डिपार्चर अँगल, openR link मल्टिमीडिया सिस्टम विथ Google built-in, तसेच 700 लिटर बूट कॅपॅसिटी (छतापर्यंत) यांसारख्या प्रीमियम सुविधा समाविष्ट आहेत.
इंजिन पर्यायांबाबत बोलायचे झाल्यास, नवीन Duster मध्ये Turbo TCe 160 इंजिन देण्यात आले असून, ते 163 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय Turbo TCe 100 आणि अत्याधुनिक Hybrid E-Tech 160 असे पर्यायही उपलब्ध असतील. Hybrid E-Tech 160 मध्ये 1.8L पेट्रोल इंजिन आणि 1.4 KWH बॅटरी देण्यात आली असून, ही प्रणाली बेस्ट-इन-क्लास इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते.
एकूणच पाहता, Kiger आणि Triber या सिद्ध मॉडेल्सची मजबूत विक्री, तसेच नवीन जनरेशन Duster च्या दमदार आगमनामुळे रेनो इंडियाने 2026 मध्ये सकारात्मक सुरुवात केली आहे. येत्या काळात आणखी नवीन उत्पादने आणि अपडेट्सच्या माध्यमातून कंपनी आपली बाजारातील हिस्सेदारी वाढवण्यावर भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.






