(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार, सध्या नाह्याने कुटुंबामध्ये सत्तेवरुन अंतर्गत वाद सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांचे भाउ शेख तहनून बिन झायेद हे यूएईच्या संरक्षण व्यवस्थेतील सर्वात प्रभावशाली आणि ताकदवर मानले जातात. त्यांनी अमेरिकेशी क्रिप्टोकरन्सीमधून जवळीक वाढवली आहे. तसेच ते सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स यांच्या जवळचे व्यक्ती मानले जातात.याच वेळी यूएईचे येमेनमधील सत्तावर्चस्वावरुन सौदी अरेबियाशी संबंध बिघडजले आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात अमिरातीच्या अध्यांक्षावर तहनून यांच्याद्वारे दबाव आणला जाऊ शकतो याचा कारणामुळे सध्या सौदी अरेबियामध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय केवळ आर्थिक नसून राजकीय बदलाचे संकेत आहेत. वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या अहवालानुसार, शेख खालिद यांना भविष्यातील राष्ट्राध्यक्ष म्हणून तयार केले जात आहे. शेख खालिद बिन मोहम्मद हे सध्या यूएईचे राजकुमार असून त्यांचा जन्म 1982 मध्ये झाला होता. त्यांनी आपले शिक्षण अबूधाबीमध्ये पूर्ण केले आहे. तसेच उच्च शिक्षण त्यांनी अमेरिकेच्या जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सर्व्हिसमध्ये केले आहे. 2016 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करत देशाच्या सुरक्षा यंत्रणेची जबाबादीर स्वाकारली होती. तर 2023 मध्ये त्यांना युएईचे अधिकृत क्राउन प्रिन्स म्हणून घोषित करण्यात आले होते.
ब्लूमर्गच्या अहवालानुसार, नाह्यान कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबामध्ये गणले जातात. नाह्यान कुटुंबाकडे सध्या ३३५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी संपत्ती आहे. यूएईच्या सत्ताधारऱ्यांच्या कुटुंबाच्या संपत्ती तेल उत्पादनावर चालते.






