भातुकली (Bhatukali). आपल्या घरात विजेचा दिवा लागावा, घर-आंगण त्या दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघावे यासाठी वीज कनेक्शनची (electricity connection) मागणी करणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांची संख्या शेकडोच्या घरात आहे. ही कहानी आहे, गेल्या तीस वर्षांपासून वीज कनेक्शन मिळण्याची वाट पाहणाऱ्या एका वृद्धाची. मरण्याच्या अगोदर आपल्या घरात विजेच्या दिव्याचा प्रकाश व्हावा, (o light their house and illuminate their yard.) ही त्याची इच्छा. महावितरणचे सहायक अभियंता योगेश लहाने (MSEDCL Assistant Engineer Yogesh Lahane) यांनी अखेर लोकवर्गणीतून ‘त्या’ वृद्धाची इच्छा पूर्ण केली.
भातकुली आसरा मार्गावरील दहातोंडा फाट्यावर अजाबराव विश्वासराव ताथोड हे पत्नीसह ५० वर्षांपासून येथे घर वजा मंदिरात वास्तव्यास आहेत. त्यांनी गत ३० वर्षापासून वीज पुरवठा मिळण्यासाठी पूर्वीची एमएसईबी व आताच्या महावितरण तसेच जनप्रतिनिधींकडे वीजपुरवठा मिळण्याकरिता पाठपुरावा केला. वय थकल्यामुळे शेवटी त्यांनी वीज मिळण्याचे प्रयत्न सोडून दिले.
[read_also content=”एमआयडीसीतील ‘त्या’ वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला खुलासा; पोलिसांकडून तिघांना अटक https://www.navarashtra.com/latest-news/the-murder-of-that-old-woman-in-midc-has-been-revealed-three-arrested-by-police-nrat-129745.html”]
साहेब मी आता बिना लाईटचा मरतो, तुम्ही काही टेंशन घेऊ नका. अशा शब्दात वृद्धाने आपल्या भावना व्यक्त केल्या. विजेसाठी एक छोटे रोहित्र मिळून अंदाजे २ लाख रुपये खर्च लागणार होते. हे काम एका व्यक्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे ते नामंजूर झाले. शेवटचा पर्याय स्वखर्चाने हे काम करायचे होते.
दाम्पत्य अत्यंत गरीब असल्यामुळे भातकुली येथील सहायक अभियंता योगेश लहाने यांनी लोकवर्गणी जमा करून व स्वतः पुढाकार घेऊन अंदाजपत्रक तयार करून छोट्या स्कीममध्ये काम करण्याचे ठरविले व एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्राप्त करून भातकुली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांच्याहस्ते या रोहित्रचे उद्घाटन करून ताथोड यांच्या कुटुंबाला वीज मिळवून दिली.
आज हातून एक चांगले कार्य घडले. वृद्ध व्यक्ती विद्युत पुरवठ्यापासून वंचित होती. शेवटी लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला आणि वीज मिळवून दिली. त्याचे समाधान आहे.
— योगेश लहाने, कनिष्ठ अभियंता, महावितरण
रून व स्वतः पुढाकार घेऊन अंदाजपत्रक तयार करून छोट्या स्कीममध्ये काम करण्याचे ठरविले व एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्राप्त करून भातकुली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांच्याहस्ते या रोहित्रचे उद्घाटन करून ताथोड यांच्या कुटुंबाला वीज मिळवून दिली.