तुनिषा शर्मा आत्महत्या (Tunisha Sharma Case) प्रकरणी रोज नवे नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाला वेगळं वळण आलं असून शिजानच्या आई आणि दोन्ही बहिणींनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. मात्र, या आरोपांवर तुनिषाचे काका पवन शर्मा त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.तुनिषाने धर्मांतर करण्यासंदर्भातली बाब आईसोबत शेअर केली होती. तुनिषाच्या वागण्यातही बदल झाला होता. असा दावा त्यांनी केला आहे.
[read_also content=”महावितरणाचा तीन दिवसीय संप, वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा इशारा! https://www.navarashtra.com/maharashtra/the-governments-warning-to-take-action-against-electricity-workers-under-mesb-nrps-359098.html”]
आज ४ जानेवारीला तुनिषा शर्माचा वाढदिवस आहे. या पार्श्नभुमिवर तुनिषा आत्महत्या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे त्यांनी केले आहेत. शीजनच्या कुटुंबीयांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संजीव कौशलचा उल्लेख केल्याचे मामा पवन शर्मा यांनी सांगितले की, संजीव कौशल हा तुनिषाचा कौटुंबिक मित्र आहे आणि तुनिषाचे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. तुनिषा फक्त तिची आई वनिता शर्माच्या खूप जवळ होती, असेही त्याने सांगितले. पवन शर्मा हा तुनिषाच्या कुटुंबाला गेल्या 8 वर्षांपासून ओळखतो आणि तो तुनिषाच्या आईचा भाऊ आहे. असे त्यांनी सांगितले.तुनिषा धर्मांतराबाबत आईसोबत बोलली होती. तसेच,तुनिषाच्या वागण्यातही बदल झाला होता. हे फक्त मी किंवा तिची आई म्हणत नाही तर तुनिषाच्या टीव्ही शोचे लोक, तिचा ड्रायव्हर असे सगळेच म्हणत आहेत. पोलीस या सर्व गोष्टींचा तपास करत असून तपासात जे काही समोर येईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे ते म्हणाले.
तुनिषाचे त्याच्या कुटुंबाशी चांगले संबंध नव्हते. तिची आई आणि संजीव कौशल हे दोघं तिचं आयुष्य कंट्रोल करत होते. तिच्या आईची फक्त तिच्या पैशांवरच नजर होती. हिजाब, दर्गा बद्दल सांगितलेलं सर्व खोटं आहे. तिची मानसिक स्थीती खुप खराब होती. आई फक्त कामासाठी तिच्यावर दबाव टाकत होती.तुनिशा आमच्यासाठी मुलीसारखी होती. तिच्या जाण्याने आम्ही खुप खचलो आहे. असं त्यांनी म्हण्टलंय. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती नेहमी उदास राहत होती. तिने तिचा शेवटचा वाढदिवस तिच्या वडिलांसोबत आनंदाने साजरा केला होता, त्यानंतर ती आता साजरा करणार होती. अशी माहिती त्यांनी दिली. तर, तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांच्यात काय संबंध आहे याची चौकशी केली जात असल्याच शीझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं आहे