मिरज : मिरजेतील शेतकरी चौकात दोन गुन्हेगारांत जोरदार हाणामारी झाली. ही घटना सोमवारी रात्री घडली. यादरम्यान तरुणांचे दोन गटही भिडले होेते. या प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोघेही खुनातील आरोपी
शेतकरी चौकात खुनातील दोन आरोपींची जामिनावर सुटका झाली होती. मात्र, न्यायालयात सुनावणीसाठी त्यातील एक व्यसनाधीन आरोपी तरुण उपस्थित राहत नसल्याने दुसऱ्या आरोपीचा संताप अनावर झाला.
कोर्टात हजर नसल्याचा विचारला जाब
सोमवारी रात्री कोर्टात तारखेला हजर राहत नसल्याबद्दल दुसऱ्याला जाब विचारला. यातून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यानंतर त्यांचे साथीदारही एकमेकांना भिडले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.