फोटो सौजन्य- iStock
२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरला होणाऱ्या युजीसी नेट परीक्षेसाठी एनटीए कडून सिटी स्लिप जारी करण्यात आली आहे.ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यांनी अधिकृत वेबसाईटवरुन सिटी सिल्प डाऊनलोड करावी. NTA ने अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर UGC NET जून 2024 परीक्षेची सिटी स्लिप देखील अपलोड केली आहे. UGC NET 2024 सिटी स्लिपमध्ये उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्राच्या शहर अलॉटमेंटची माहिती दिली जाते. ते अॅडमिट कार्ड नसते.
NTA चे नोटिफिकेशन
UGC ने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये लिहिले आहे की, – “NTA आता 28, 29 आणि 30 ऑगस्ट 2024 आणि 02, 03 आणि 04 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या UGC-NET जून 2024 साठी परीक्षा शहराच्या अलॉटमेंटसाठी सूचना असून उमेदवारांनी कृपया लक्षात घ्या की हे परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) नाही. उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्राचे शहर अलॉटमेंट करण्याची ही आगाऊ सूचना आहे. UGC-NET जून 2024 चे प्रवेशपत्र नंतर प्रसिद्ध केले जाईल.”
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली
सोमवार २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रोजी होणारी UGC NET परीक्षा NTA कडून पुढे ढकलण्यात आली होती. २६ ऑगस्ट ऐवजी ही परीक्षा २७ ऑगस्टला होणार आहे. युजीसी नेट परीक्षेमध्ये 83 विषयांचा समावेश असून ही परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. २ ऑगस्ट २०२४ च्या सूचनेनुसार, २६ ऑगस्टच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. उर्वरित परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत.
प्रवेशपत्र (Admit Card) कधी देण्यात येईल
एनटीएने सध्या सिटी स्लिप जारी केल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली नसली तरी सामान्यत: एनटीएकडून परीक्षेच्या ३ दिवस आधी प्रवेशपत्र जारी करण्यात येते.
UGC NET 2024: जून मधील परीक्षा का रद्द करण्यात आली?
यापूर्वी यूजीसी नेट परीक्षा १८ जून रोजी आयोजित करण्यात आली होती, मात्र देशभरात झालेल्या पेपरफुटीमुळे १९ जून रोजीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. एनटीएने नंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली.
UGC NET 2024 परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी-