Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रावर पाणी संकट! विहिरी, बोअरवेल आटले; तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 02:35 AM
महाराष्ट्रावर पाणी संकट! विहिरी, बोअरवेल आटले; तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा
Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई
अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
राज्यातील पाणीसाठयात घट

मुंबई: राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्याअसून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.दिनांक ११ मे ते १७ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांमध्ये एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ठाणे विभागात सर्वाधिक १७७ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरमध्ये ३३ शासकीय तर ६६९ खासगी टँकरचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडू लागल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकर हा नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार ठरत आहे.

Akola water crisis : ४५ डिग्री तापमान आणि पिण्यासाठी पायपीट! कवठा गावात भीषण पाणीटंचाई

छत्रपती संभाजीनगर विभागात १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी एकूण २४४ टँकर कार्यरत असून राज्यातील सर्वाधिक टँकर या विभागात वापरण्यात येत आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सध्या कोणत्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून टँकर पुरवठ्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा वापर, विहिरींचे अधिग्रहण आणि जलसाठ्यांचे नियोजन यावरही भर दिला जात आहे.

Sambhajinagar : वाळूज मधील संतप्त महिलांचा MIDC कार्यालयात ठिय्या, पाण्यासाठी वणवण

आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वाळूजमध्ये पाण्यासाठी वणवण

२५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना कामावर सुट्या माराव्या लागतात. यामुळे संतप्त झालेले नागरिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले आहेत.अभियंत्यांच्या कार्यालयासोमार महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. .

Web Title: Water crises in mahrashtra supply water with tanker in 15 districts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Water Crisis
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
2

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर
3

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.