फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. मध्यंतरी त्यांच्या घटस्फोटाच्याही चर्चा रंगल्या होत्या. चर्चांवर अभिषेकने प्रत्युत्तर देत सर्वांचीच बोलतीही बंद केली होती. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकला लग्नाच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न एका सुप्रसिद्ध मॉडेलने केला होता. ही घटना फार कमी लोकांनाच माहित आहे.
ती मॉडेल म्हणजे जान्हवी कपूर. ही जान्हवी कपूर अभिनेत्री नसून मॉडेल आहे. तिने ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी थेट स्वतःच्याच हाताची नस कापून घेतली होती. अभिषेक बच्चनचं आणि माझं २००६ मध्ये लग्न झालं आहे… असा दावा तिने केला होता. ती मॉडेल इतक्यावरच थांबली नाही. तिने अभिषेकच्या विरोधात पोलीस तक्रारही केली होती. मॉडेल जान्हवी कपूर हिच्याकडे अभिषेकसोबत लग्न केल्याचे कोणतेही सबळ पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला.
हे देखील वाचा – उर्फी जावेदची तब्येत बिघडली, सेटवरच झाली बेशुद्ध; नेमकं कारण काय?
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मोडण्यासाठी जान्हवीने अनेक प्रयत्न केले. ऐन लग्नाच्याच दिवशी जान्हवी हिने स्वतःच्या हाताची नस कापली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. जान्हवीने आत्महत्येचा प्रयत्न हा केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून केला होता. अभिषेक बच्चनने जान्हवीशी आपले कोणतेही नाते असल्याचे सांगताच केवळ मॉडेलचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, त्यानंतर जुहू पोलिसांनी मॉडेलवर कलम ३०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. लग्नाच्याच दिवशी जान्हवीने गोंधळ घातल्यामुळे लग्न सोहळ्याचा आनंद कमी झाला होता.

ऐश्वर्या- अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने उचललं होतं मोठं पाऊल
ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न फार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झालं होतं. मुख्य बाब म्हणजे त्यांच्या लग्नात बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार देखील उपस्थित नव्हते. त्यांचं लग्न २००७ मध्ये झालं होतं.
हे देखील वाचा – प्रसिद्ध फॅशन एन्फ्लूएंसरवर कोसळला दु:खाचा डोंगर, पोस्ट शेअर करत झाली भावुक






