कर्नाटक: कर्नाटकातील नेलमंगला येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. निवृत्त पोलीस उपाधिक्षकाच्या मुलीने हुंडा, आक्षेपार्ह टिपण्णी आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप पती आणि सासऱ्यावर केले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
तक्रार करता अनिताचा विवाह २ नोव्हेंबर २०२१३ रोजी डॉ. गोवर्धन याच्याशी झाला होता.तिच्या वडिलांनी लग्नामध्ये सुमारे २५ लाख रुपये ज्यामध्ये सोने, चांदी आणि इतर खर्च केले होते. अनिताच्या तक्रारीनुसार, लग्नाला केवळ १५ दिवस झाल्यानंतर पती डॉ. गोवर्धन याने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या माहेरच्या संपत्तीत आणि भाड्याच्या उत्पन्नात हिस्सेदारीची मागणी सुरु केली. नवऱ्याला नोकरी सोडून स्वतःचा नर्सिंग होम सुरु करायचा होता. यासाठी वडिलांकडून पैसे घेऊन येण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप अनिताने केला आहे.
मॉडर्न मुलींसारखे, शॉर्ट कपडे घालून ये
एवढेच नाही तर अनिताने सर्वात गंभीर आरोप तिचे सासरे प्रोफेसर नागराजू यांच्यावर केले आहेत. सासरे केवळ अश्लील टिप्पण्या करत नव्हते, तर शारीरिकरित्याही तिला त्रास देत होते. तिचे सासरे तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करत होते. लग्नाला इतके महिने झाले, कोणतीही गुड न्यूज का नाही? किंवा माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल ठेवत तर मीच येतो. ‘मॉडर्न मुलींसारखे, शॉर्ट कपडे घालून माझ्यासमोर यायचे’ असे देखील तिच्या सासऱ्यांनी सांगितले.
घरातला विषय आहे सांभाळून घे
हा सगळा प्रकार अनिताने तिच्या घरात सांगितले त्यावेळी तिचा नवरा डॉ. गोवर्धन आणि सासूने तिलाच उलट समजावले. घरातला विषय आहे, सांभाळून घे असे म्हंटले. अनिताच्या तक्रारीवरून पती, सासरे आणि सासू यांच्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अनिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती, सासरे आणि सासू या तिघांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
Ans: तिघांविरुद्ध
Ans: नेलमंगळा
Ans: 15 दिवस






