राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (फोटो- टीम नवराष्ट्र)
रत्नागिरीत महायुती, मविआमध्ये फूट
अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस महायतीतन बाहेर
सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढणार
रत्नागिरी: जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी अशी मुख्यत्वे निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. परंतु आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी रत्नागिरीमध्ये बंडखोरांनी अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे राजकीय भूकंप घडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात फूट पडल्याचे दिसून आले आहे. या वेळची निवडणूक ही तिरंगी आणि चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरीत नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा निर्णय आधी झाला होता. परंतु आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीमधून अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर पडून पक्षाचे 14 स्वतंत्र उमेदवार रत्नागिरीच्या निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीतही फूट पडून त्या पक्षाचे नेते बशीरभाई मूर्तुझा यांनी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची पत्नी वहिदा बशीरभाई मुर्तुझा यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दाखल करण्यात आला आहे.
अर्ज मागे घेण्याची तारीख २१ नोव्हेंबर
या राजकीय घटनांनी रत्नागिरीतच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असून त्यावेळी जिल्ह्यातील खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे जात असल्याची घोषणा आज पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख बंटी वणजू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
महायुती म्हणत असताना स्त्नागिरीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही प्रकारे जागा देण्यात आली नाही. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला अशी माहिती बंटी वणजू यांनी दिली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ठाकरे शिवसेनेला उमेदवारी देण्यात आली, असे यावेळी बशीरभाई मूर्तुझा यांनी सांगितले.
बाळ मानेंच्या सुनेने भरला अर्ज
परंतु काही काळापूर्वी भाजपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झालेले माजी आमदार बाळ माने यांनी आपली सून शिवानी सावंत माने यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली.
Ans: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असणार आहे. .
Ans: रत्नागिरी जिल्ह्यात या वेळची निवडणूक ही तिरंगी आणि चौरंगी होण्याची शक्यता आहे.






