महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' खास ड्रिंकचे सेवन
लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच तयारीला सुरुवात केली जाते. लग्नातील साड्यांची खरेदी, दागिने, मेकअप इत्यादी अनेक गोष्टी आधीच तयार केल्या जातात. तसेच लग्नाला एक महिना राहिल्यानंतर मुली पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. फेशिअल, क्लीनअप, स्किन ट्रीटमेंट्स इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. लग्नात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण स्किन ट्रीटमेंट्स करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर करू शकता. लग्नाची तयारी, खरेदी, ताण, अपुरी झोप, सततच्या धावपळीमुळे नवरीची व्यवस्थित झोप होत नाही. अपुऱ्या झोपेचा परिणाम त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर खूप जास्त थकवा जाणवून त्वचा निस्तेज दिसते. लग्नाच्या काही दिवस आधी चेहऱ्यावर वाढलेला थकवा त्वचेची गुणवत्ता खराब करून टाकतो.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो एका दिवसात येत नाही. यासाठी दोन ते तीन महिने आधीपासून आहारात बदल करून त्वचेची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण दिल्यास त्वचा खूप जास्त सुंदर दिसते. यासाठी नियमित आहार, हायड्रेशन आणि शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिनाभरात चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी ब्रायडल स्किन ड्रिंक्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या ड्रिंकचे महिनाभर नियमित सेवन केल्यास त्वचेसह केस सुद्धा सुंदर दिसतील.
ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले बदाम, पिस्ता, भिजवलेले केशरचे पाणी, चिमूटभर वेलची पावडर आणि १ ग्लास नारळाचे दूध, मिक्स बिया घालून स्मूदी तयार करा. तयार केलेले ड्रिंक सकाळी नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. हेल्दी ड्रिंकचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय भिजवलेल्या पदार्थांमध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-फॅटी ॲसिड्स, आयर्न आणि कोलाजेन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे स्किन पोर्स क्लीन, कॉम्प्लेक्शन ब्राइट, आणि केस खूप जास्त मुलायम होतात. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही नियमित सुद्धा सुका मेवा घालून बनवलेले ड्रिंक बनवून पिऊ शकता.






